esakal | मोदी सरकार पाकिस्तानला आणखी लस पाठवणार; काँग्रेस, आपचा केंद्रावर हल्लाबोल
sakal

बोलून बातमी शोधा

ARvind Kejriwal.

देशातील नागरिकांचा जीव धोक्यात घालून पाकिस्तानला लस निर्यात करणे योग्य आहे, का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

मोदी सरकार पाकिस्तानला आणखी लस पाठवणार; काँग्रेस, आपचा केंद्रावर हल्लाबोल

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा भासत असल्याची ओरड देशभरातून होऊ लागली असतानाच लस निर्यातीबद्दल आता केंद्र सरकारला जाब विचारला जाऊ लागला आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लस निर्यातीला आक्षेप घेतला आहे, तर देशातील नागरिकांपेक्षा केंद्राला पाकिस्तानातील नागरिक महत्त्वाचे वाटत आहे. म्हणून त्या देशाला कोरोना भारत प्रतिबंधक लस निर्यात करणार असल्याची टीका आम आदमी पक्षाने केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर केलेल्या चर्चेत ११ ते १४ एप्रिल या काळात लसीकरण महोत्सव करण्याचे आवाहन केले आहे. परंतु अनेक राज्यांमध्ये लसीचा साठा संपुष्टात आल्याचे चित्र आहे. अशा काळात हा उत्सव कसा करायचा, असा प्रश्‍न विचारला जात आहे. राहुल गांधी यांन ट्विट करीत, लसीचा तुटवडा ही गंभीर समस्या आहे, उत्सव नाही, अशा शब्दांत मोदी यांना लक्ष्य केले. तसेच सर्व राज्यांना पक्षपात न करता मदत करा असे सांगताना, देशातील नागरिकांचा जीव धोक्यात घालून लस निर्यात करणे योग्य आहे, का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा - इम्रान खान यांच्या बलात्कारावरील वक्तव्यावरुन घटस्फोटीत पत्नीने सुनावलं, म्हणाली...​

‘आप’चे राष्ट्रीय प्रवक्ते राघव चढ्ढा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर टीका केली. ते म्हणाले, ‘‘आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, उत्तराखंड, ओडिसा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, तेलगंणा यांसह सर्व राज्यातील लसीकरण येत्या दोन-चार दिवसांत थांबणार आहे. कारण लसींचा तुटवडा भासू लागला आहे. लसींचा पुरवठा झाल्याशिवाय या राज्यांमध्ये लसीकरण होऊच शकणार नाही. महाराष्ट्रात पुण्यात काल १०९ लसीकरण केंद्र बंद झाले आहेत, ओडिशात सातशेहून अधिक केंद्रे बंद झाले आहे. एकीकडे देशातील सर्व राज्यातील लसींचा साठा संपुष्टात येत असताना भाजप सरकार लस निर्यात करीत आहेत.’’

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘‘भारतातील नागरिक लसीकरण केंद्राबाहेर लसीचे सुरक्षा कवच मिळण्यासाठी रांगा लावून आहेत. देशातील लस संपली आहे. भाजप सरकारने मात्र ८४ देशांना लसीचे साडेसहा कोटी डोस निर्यात केली आहे. बांगलादेश, म्यानमार, नेपाळ, मालदिव, अफगाणिस्तान, मॉरिशस यांसारख्या काही देशांना तर भारताने भेट म्हणून लसीचे डोस पाठविले आहेत. जगातील अमेरिका, ब्रिटन, कॅनडा यांसारख्या देशांनी त्यांच्या देशातील दोनवेळा लस देता येतील, एवढे डोस साठवून ठेवले आहेत. आपण मात्र देशवासियांचा विचार न करता लस निर्यात करीत आहोत,’’ असे चढ्ढा यांनी सांगितले.

दहशतवादी देशाला भारताची लस
केंद्र सरकारची आणखी धक्कादायक बाब म्हणजे आता हे सरकार पाकिस्तानला लसीचे साडेचार कोटी डोस देणार आहे. या सरकारला भारतीय नागरिक महत्त्वाचे आहेत, की दहशतवादाला पोसणारे पाकिस्तानी? भाजप आणि केंद्राने याचे उत्तर दिले पाहिजे. पाकिस्तान भारतात दहशतवादी निर्यात करीत आहे, तर भारत त्यांना जीवनदायी लसींचे डोस निर्यात करीत आहे. मानवी पातळीवर इतर देशांना मदत करा. परंतु आधी आपल्या देशातील नागरिकंच्या प्रती असलेले कर्तव्य केंद्र सरकारने बजावावे. देशातील सर्व नागरिकांना लसीचे दोन्ही डोस द्या, नंतर कुणाला हवी तेवढी लस पाठवा, अशी उद्विग्नता राघव चढ्ढा यांनी व्यक्त केली

loading image