काँग्रेसला पराभव मान्य, नागरिकांच्या मताचा आदर : शिवकुमार

वृत्तसंस्था
सोमवार, 9 डिसेंबर 2019

कर्नाटकातील 15 मतदारसंघात नागरिकांनी जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे. पराभव आम्ही स्वीकारतो.

बंगळूर : कर्नाटकात विधानसभा पोटनिवडणुकीत नागरिकांनी दिलेल्या जनादेशाचा आम्ही आदर करतो. काँग्रेसला पराभव स्वीकार करतो, असे काँग्रेसचे ज्येष्ठ् नेते डी. के. शिवकुमार यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप

कर्नाटकात बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार तरल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपला सरकार टिकण्यासाठी आवश्यक असलेल्या सहा जागा जिंकण्यात यश आले आहे. विधानसभेच्या 15 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीचा आज (सोमवार) निकाल लागला. आज मतमोजणीला सुरवात झाल्यापासून भाजपने आघाडी घेतली होती. भाजपने जवळपास 10 जागांवर विजय मिळविलेला आहे. त्यामुळे येडियुरप्पा सरकारला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कर्नाटकमध्ये भाजप सरकार तरलं; सहा जागांवर विजय

याविषयी बोलताना शिवकुमार म्हणाले, की कर्नाटकातील 15 मतदारसंघात नागरिकांनी जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे. पराभव आम्ही स्वीकारतो.

ठाकरे सरकारमुळे ३००० मराठा तरुणांना मिळणार दिलासा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress accepts defeat; people have accepted the defectors, says DK Shivakumar