Loksabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातच सापडले 1.8 कोटी, काँग्रेसने दिले व्हिडिओ प्रूफ

वृत्तसंस्था
बुधवार, 3 एप्रिल 2019

नवी दिल्ली - काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यालेळी त्यांनी भाजपवर  अरूणाचल प्रदेशमध्ये पैसे देऊन मत विकत घेण्याचा आरोप केला आहे. पैसे जप्त केलेल्या कारवाईचा व्हिडिओ देखील यावेळी जारी करण्यात आला आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांच्या ताफ्यातून 1.8 कोटी रूपये जप्त करण्यात आले असल्याचे सुरजेवाला म्हणाले. भाजप मते विकत घेण्यासाठी पैसे वापरणार होते का? हा काळा पैसे आहे का? असे अनेक प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केले.

अरूणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यावर निवडणुक आयोगाने गुन्हा दाखल का केला नाही? असाही पश्न देखील काँग्रेसने उपस्थित केला आहे. या प्रकरणावर तीन जणावर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि प्रदेश अध्यक्षांचा समावेश आहे.

मंगळवारी रात्री उशीरा मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे प्रदेश अध्यक्ष यांच्या ताफ्यातून तब्बल 1.8 कोटी जप्त करण्यात आले. हा प्रकार तेव्हा झाला जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दुसऱ्या दिवशी अरूणाचल प्रदेशमध्ये रॅली होणार होती असेही सुरजेवाला म्हणाले. निवडणुक आयोगाच्या आधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पेसै जप्त करण्याचा व्हिडीओ सोशल मीडिायवरही व्हायरल झाला आहे.

Web Title: Congress accuses BJP of indulging in cash for votes in Arunachal ahead of PM Narendra Modis rally