फॉर्म्युला ठरला! काँग्रेसला दिल्लीमध्ये 3 जागा देण्यास आप तयार; पण, गुजरात, हरियाणा, गोव्यात हव्या इतक्या जागा?

Congress and the Aam Aadmi Party AAP held discussions to finalise the seat sharing formula : इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत सकारात्मक पाऊल पडताना दिसत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबाबत सकारात्मक दिशेने चर्चा झाली आहे.
Congress and the Aam Aadmi Party AAP held discussions to finalise the seat sharing formula
Congress and the Aam Aadmi Party AAP held discussions to finalise the seat sharing formula

नवी दिल्ली- इंडिया आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत सकारात्मक पाऊल पडताना दिसत आहे. काँग्रेस आणि आम आदमी पार्टीची बैठक सोमवारी पार पडली. यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या फॉर्म्युलाबाबत सकारात्मक दिशेने चर्चा झाली आहे. बैठकीमध्ये दिल्ली आणि पंजाबमधील जागांबाबत तोडगा काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Congress and the Aam Aadmi Party AAP held discussions to finalise the seat sharing formula in Punjab and Delhi for the Lok Sabha polls)

काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत, मुकूल वासनिक यांच्यासह जागा वाटपाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या सदस्यांनी बैठक घेतली. यात आपकडून राज्यसभा खासदार संदीप पाठक, दिल्ली सरकारमधील मंत्री आतिषी आणि सौरभ भारदवा इत्यादी नेते देखील उपस्थित होते. नेत्यांनी जागावाटपाबाबत माध्यमांना माहिती दिली नाही. पण, सूत्रांनी आतली माहिती दिली आहे.

Congress and the Aam Aadmi Party AAP held discussions to finalise the seat sharing formula
India Aghadi : जागावाटपासाठी तारीख निश्चित नाही; ‘इंडिया’ आघाडीबाबत काँग्रेसने केली भूमिका स्पष्ट

सूत्रांच्या माहितीनुसार, आपने काँग्रेसला दिल्लीमध्ये लोकसभेच्या तीन जागा देण्याची तयारी दाखवली आहे. काँग्रेसचा दिल्लीमध्ये सध्या एकही खासदार नाही. त्यामुळे आपने एकप्रकारे उदार भूमिका घेतल्याचं चित्र आहे. मात्र, दुसरीकडे आपने गुजरात, हरयाणा आणि गोव्यामध्ये काँग्रेसकडून उदार भूमिकेची अपेक्षा देखील केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आपने गुजरातमधील १ जागा मागितली आहे, तर हरियाणात ३ आणि गोव्यातील एका लोकसभेची मागणी केली आहे. विशेष म्हणजे पंजाबमध्ये सत्ता असलेल्या आपने काँग्रेसला ६ जागा देण्यासाची तयारी केली आहे. पंजाबमध्ये काँग्रेससोबत लोकसभा निवडणूक लढण्यास राज्यातील आपचे नेते उत्सुक नाहीत. तरी आपने इंडिया आघाडीसाठी मन मोठे करण्याचा प्रयत्न केला आहे. जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याला अंतिम रुप देणे अद्याप बाकी आहे.

Congress and the Aam Aadmi Party AAP held discussions to finalise the seat sharing formula
Nitish Kumar: नितीश कुमारांची लवकरच होणार इंडिया आघाडीच्या समन्वयकपदी नियुक्तीची घोषणा - सूत्र

इंडिया आघाडीचे दिल्लीमध्ये एक कार्यालय असावे. जेणेकरुन चर्चा आणि बैठका याठिकाणी होतील अशी सूचना देखील मिळाल्याचं कळतंय. बैठकीनंतर मुकूल वासनिक माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आप आणि काँग्रेस एकत्र लढणार आहेत आणि भाजपचा पराभव करणार आहेत. आत्ताच जागावाटपाची माहिती देणार नाही. काहीवेळ यासाठी वाट पाहा. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com