esakal | राज्यसभेत काँग्रेसची धुरा आता खर्गे यांच्याकडे 
sakal

बोलून बातमी शोधा

Mallikarjun-Kharge

लोकसभेमध्ये खर्गे यांना काँग्रेसच्या गटनेते पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तर, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर खर्गे यांना काँग्रेसने राज्यसभेत आणले.

राज्यसभेत काँग्रेसची धुरा आता खर्गे यांच्याकडे 

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ समाप्त झाल्यानंतर काँग्रेसने राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी नियुक्ती केली आहे. यासंदर्भात राज्यसभेचे अध्यक्ष एम. वेंकय्या नायडू यांना काँग्रेसतर्फे आज औपचारिक पत्र देण्यात आले. 

चार दशकांचा राजकीय अनुभव असलेले मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेस संघटनेप्रमाणेच कर्नाटक राज्य सरकारमध्ये आणि केंद्र सरकारमध्येही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. मागील लोकसभेमध्ये खर्गे यांना काँग्रेसच्या गटनेते पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. तर, २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर खर्गे यांना काँग्रेसने राज्यसभेत आणले. तेव्हापासूनच खर्गे यांच्याकडे राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी येणार अशी चर्चा सुरू होती. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यसभेत जम्मू-काश्मीरचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गुलाम नबी आझाद यांचा कार्यकाळ १५ फेब्रुवारीला संपुष्टात येत असल्याने राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपदही रिक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेतेपदी आझाद यांच्या जागी मल्लिकार्जुन खर्गे यांची नियुक्ती केली जावी, अशा आशयाचे पत्र काँग्रेसतर्फे देण्यात आले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा