Congress : निलंबित झालेल्या रजनी पाटलांवर काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress appoints Rajani Patil as whip of party in Rajya Sabha Pramod Tiwari as deputy leader

Congress : निलंबित झालेल्या रजनी पाटलांवर काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आलेल्या काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.(Congress appoints Rajani Patil as whip of party in Rajya Sabha Pramod Tiwari as deputy leader )

राज्यसभेत काँग्रेसनं व्हीप म्हणून खासदार रजनीताई पाटील यांची नियुक्ती केली आहे. राज्यसभेत काँग्रेसचे उपनेते म्हणून प्रमोद तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याआधी आनंद शर्मा होते, तर राज्यसभा गटनेतेपदी मल्लिकार्जुन खरगे यांना कायम ठेवण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी रजनी पाटलांच निलंबन

राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावेळी विरोधी पक्षाच्या खासदारांनी घातलेल्या गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी काँग्रेसच्या खासदार रजनीताई पाटील यांचं अधिवेशन काळात निलंबन करण्यात आलं आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला.

Sushma Andhare: 'प्रिय निलू बाळा, तू अत्यंत कळकळीने…' सुषमा अंधारेंचं ट्विट चर्चेत

रजनी पाटील यांच्या कथित बेशिस्तीचं प्रकरण हक्कभंग समितीकडं प्रलंबित आहे. मोदींच्या भाषणाच्या वेळी विरोधकांचा गोंधळ संसद टीव्हीने दाखवला नव्हता. पडद्यावर फक्त मोदीच होते.

हे लक्षात आल्यावर काँग्रेसमधील एका खासदारानं शक्कल लढवली. त्याने रजनीताईंना काँग्रेस सदस्यांची घोषणाबाजी मोबाइलवर चित्रित करायला सांगितली. त्या सदस्याचं ऐकून रजनीताईंनी सगळा प्रकार चित्रित केला. चित्रीकरण होतंय हे भाजपच्या सदस्यांच्या लक्षात आलेलं होतं.

राज्यसभेचं कामकाज संपेपर्यंत चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झालेली नव्हती. ती व्हायरल करण्याचं काम दुसऱ्या कोणी तरी केलं होतं, त्यामध्ये रजनीताईंचा हात नव्हता. दुसऱ्या दिवशी दुपारी रजनीताई सभागृहात बसल्या होत्या. आपल्याला निलंबित केलं जाईल याची त्यांना कल्पनाही नव्हती. अचानक त्यांच्यावर कारवाई झाल्याची घोषणा झाली.

टॅग्स :Congress