
Sushma Andhare: 'प्रिय निलू बाळा, तू अत्यंत कळकळीने…' सुषमा अंधारेंचं ट्विट चर्चेत
शिवसेनेचे फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे सध्या नेहमी आपल्या परखड वक्तव्याने चर्चेत असतात. दरम्यान, त्यांचे एक ट्विट चर्चेत आलं आहे. त्यांनी ट्विटद्वारे निलेश राणेंच्या ट्विटला जोरदार प्रत्युत्तर दिले. (sushma andhare tweet Nilesh Rane Criticism Of Supriya Sule Baramati maharashtra politics )
निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर टीका करताना बारामतीचा खासदार बदलावा लागेल, अशी टीका केली होती. त्यावर सुषमा अंधारेंनी ट्वीट करत राणेंना प्रत्युत्तर दिलं.
“प्रिय निलू बाळा, तू अत्यंत कळकळीने लिहिलेस म्हणून, हिंदुत्ववादी आहोत म्हणत केंद्रात भाजपा अन् राज्यात ईडी सरकार आले. तरीही शिवसेनाभवनच्या समोर हिंदुत्वासाठी आक्रोशमोर्चा काढावा लागत असेल, तर याचा अर्थ विद्यमान सरकार हे हिंदुत्वविरोधी आहे. त्यामुळे ते बदलावेच लागेल नाही का?” असा खोचक सवाल उपस्थित केला.
निलेश राणेंचं काय होतं ट्विट?
सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या न सुटल्यास आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर राणे यांनी ट्विट केले. “या ठिकाणी ६ पैकी २ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत.
Shivsena : शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे अन् आमदार प्रकाश सुर्वे यांचा मॉर्फ व्हिडीओ व्हायरल
अजित पवार अनेक वेळा पालकमंत्री राहिले आहेत. शरद पवार स्वतः बारामतीचे किंम जॉन्ग आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. एवढं असून जर आंदोलन करावं लागतं, तर बारामतीचे खासदारच बदलावे लागतील.” अशा आशयाचे ट्विट राणे यांनी केलं आहे.