काँग्रेसचे नेते उद्धट : मायावती

वृत्तसंस्था
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

''राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष (बसपा) काँग्रेसशी आघाडी करणार नाही''.

-  मायावती, सर्वेसर्वा, बहुजन समाज पक्ष

नवी दिल्ली : ''राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीत बहुजन समाज पक्ष (बसपा) काँग्रेसशी आघाडी करणार नाही'', असे बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज (बुधवार) स्पष्ट केले. तसेच काँग्रेसच्या नेत्यांचे वर्तन उद्धटपणाचे होत आहे, असेही ते म्हणाले.

मायावती म्हणाल्या, "काँग्रेसच्या नेत्यांचे वर्तन उद्धटपणाचे होत आहे. आम्ही स्वत: भाजपला पराभूत करू शकतो, असा काँग्रेसचा गैरसमज आहे. मात्र, याची सत्य परिस्थिती पाहता चुका आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून काँग्रेसला जनतेने अद्याप माफ केलेले नाही. तसेच त्यांनी त्यांच्या चुकाही दुरुस्त केल्या नाहीत. दिग्विजयसिंह यांच्यासारखे काँग्रेस नेते काँग्रेस आणि बसपाची आघाडी व्हावी, अशी त्यांची इच्छा नाही. अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) यांची त्यांना भीती वाटते". 

दरम्यान, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, असेही मायावती म्हणाल्या.

Web Title: Congress are getting arrogant says BSP Chief Mayawati