आमच्यावरील हल्ला भाजपपुरस्कृतच : काँग्रेसचा आरोप

अवित बगळे
शनिवार, 22 डिसेंबर 2018

पणजी : भाजपच्या कार्यकर्त्यांनी काल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या हल्ल्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष, संघटनसचिव, तीन मंत्री, माजी आमदार आदी सहभागी होते. यावरून हा हल्ला पूर्वनियोजित व सरकारपुरस्कृत होता, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केला. भाजपने कितीही हिंसाचार केला, हल्ले केले तरी कॉंग्रेस अहिंसावादी तत्व सोडणार नसून भाजपच्या या दडपशाहीला घाबरणारही नाही असे ते म्हणाले. 

कॉंग्रेसचे प्रदेश समिती, विधीमंडळ गट यांची संयुक्त बैठक आज झाली. यानंतर ही पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी फोंड्याचे आमदार रवी नाईक, मडगावचे आमदार दिगंबर कामत, पर्येचे आमदार प्रतापसिंह राणे, थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, नुव्याचे आमदार विल्फ्रेड डिसा, विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, सांतआंद्रेचे आमदार फ्रांसिस सिल्वेरा आदी उपस्थित होते. 

चोडणकर म्हणाले, भाजपच्या मोर्चाला फेरी धक्‍क्‍यापर्यंत परवानगी होती. ते कॉग्रेस हाऊसकडे आलेच कसे. पोलिसांना त्यांनाया दिशेला येऊ तरी कसे दिले हा प्रश्‍न आहे. सरकारी आशिर्वादाशिवाय हे शक्‍य नाही. भाजपची ही अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. लोकांना दीड तास भाजपने वाहतूक बंद करून वेठीस धरले होते. जनता हे सारे पाहत आहे, योग्य वेळी ती भाजपला धडा शिकवेल. आम्हाला येत्या निवडणुकीत भाजपचे चार आमदार निवडून येतील असे वाटत होते, आता जनता त्यांचे दोनही आमदार निवडून देणार नाहीत. गोमंतकीय समाज शांतताप्रेमी आहे. त्यांना अशी गुंडगिरी आवडत नाही. भाजपने काल काढलेला मोर्चा हा गुंडगिरीपेक्षा जराही कमी नव्हता. 
फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांच्या सहीची नक्‍कल भाजपकडून करण्यात आली होती, विधानसभेतून त्यांना हटवण्याचा प्रयत्न झाला होता. तीच प्रवृत्ती भाजपमध्ये बळावत चालली आहे असे सांगून ते म्हणाले, नैराश्‍येपोटी भाजपचे कार्यकर्ते हल्ले करत आहेत.

आम्ही महात्मा गांधीच्या शांती व अहिंसा यावर विश्‍वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत. म्हणून हिंसेचे उत्तर आम्ही हिंसेने देणार नाही. अहिंसक म्हणजे भित्रे नव्हे हे आम्ही काल दाखवून दिले आहे. आमचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर पाय रोवून उभे राहतील. कालचा प्रकार घडण्यासाठी जबाबदार असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी आमची मागणी आहे.

Web Title: congress blames BJP for the attack on their party workers