काँग्रेसने केला सत्ता स्थापनेचा दावा; राज्यपालांची घेतली भेट

Congress claims for formation of power Congress party workers meets goa governor
Congress claims for formation of power Congress party workers meets goa governor

पणजी : काँग्रेसच्या आमदारांनी आज दुपारी राजभवनावर जात राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेतली आणि सत्ता स्थापनेचा दावा केला. काँग्रेसने गेल्या वर्षभरात असा दावा सहाव्यांदा केला आहे. 

काँग्रेसने शनिवारी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर शनिवारी रात्री त्यांनी राज्यपालांची भेट मागितली होती. आज दुपारी राज्यपालांनी त्यांना भेटण्यासाठी वेळ दिली. तत्पूर्वी काँग्रेस विधीमंडळ गटाची बैठक विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या निवासस्थानी बैठक झाली. 

विधानसभेत काँग्रेसकडे सर्वाधिक 14 आमदार आहेत. मनोहर पर्रीकर यांच्याच नेतृत्वाला गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि तीन अपक्षांनी पाठींबा दिला होता. आता पर्रीकर राहिले नसल्याने आणि या पक्षांनी नव्याने पाठींबा न दिल्याने भाजपचे सरकार अल्पमतात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. राज्यपालांनी नेहमीप्रमाणे घटनात्मक तरतुदींनुसार कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com