1977 नंतर इंदिरा गांधींना दोनदा जावं लागलं होतं तुरुंगात; पुन्हा जिद्दीनं मिळवली सत्ता

indira gandhi.
indira gandhi.

नवी दिल्ली- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 36 वी पुण्यतिथी आहे. 31 ऑक्टोबर 1984 ला त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या मारुन त्यांची हत्या केली होती. यावेळी इंदिरा गांधी प्रधानमंत्री निवासात पूजा करण्यासाठी जात होत्या. इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात अनेक कणखर निर्णय घेतले होते, त्यामुळे त्यांना 'आयर्न लेडी' म्हणूनही ओळखलं जातं. 1966 मध्ये जेव्हा इंदिरा पंतप्रधान झाल्या, तेव्हा विरोधक त्यांना 'गुडिया' म्हणून हिणवत. पण, आपल्या सुरुवातीच्या 11 वर्षांच्या काळातील कठोर निर्णयांनी त्यांनी विरोधकांची तोंडं बंद केली. 

इंदिरा गांधी यांनी गरीबी हटावचा नारा दिला होता. त्यांच्या कामकाजात त्यांचे छोटे पूत्र संजय गांधींनी अनेकदा हस्तक्षेप केला. त्यांनी लोकसंख्या विस्फोट रोखण्यासाठी आणीबाणीच्या काळात नसबंदीची योजना लागू केली. या योजनेविरोधात लोकांमध्ये प्रचंड संताप होता. 1975 मध्ये इंदिरा गांधीच्या विरोधात देशव्यापी आंदोलन झाले. त्यानंतर त्यांनी आणीबाणीची घोषणा केली. आणीबाणीविरोधात लोकांमध्ये रोष होता. त्याचा परिणाम 1977 च्या निवडणुकीत दिसून आला. काँग्रेसला या निवडणुकीत मानहाणीकारक पराभवाचा सामना करावा लागला. अमेठीतून संजय गांधी यांचाही पराभव झाला.  

दिवाळीआधी Good News! इजिप्त, भुतानहून आलेल्या कांदे-बटाटेंमुळे कमी होणार महागाई

दारूण पराभवानंतरही इंदिरा गांधी खचल्या नाहीत. त्यांनी अधिक धैर्याने आणि हिंमतीने पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. इंदिरा गांधी यांच्या दोस्त पुपुल जयकर यांनी आपले पुस्तक 'इंदिरा- ऍन एंटिमेंट बायोग्राफी'मध्ये लिहिलंय की, इंदिरा गांधी आपल्या सभांमध्ये म्हणायच्या, 'मी एक प्रॅक्टिकल व्यक्ती आहे, मी प्रॅक्टिकल आहे कारण मी स्वप्नांना सत्यात बदलण्याचे जाणते'. याचमुळे 1980 च्या निवडणुकीत काँग्रेसचा मोठा विजय झाला होता. 

पुपुल जयकर यांनी लिहिलंय की, इंदिरा गांधींना भीती होती की मोरारजी सरकार त्यांना अटक करेल. त्यांची ही भीती लवकरच खरी ठरली, जेव्हा मोरारजी सरकारने  3 ऑक्टोबर 1977 ला इंदिरा गांधी यांना अटक केली. त्यांच्यासोबत अन्य चार माजी केंद्रीय मंत्र्यांनाही अटक करण्यात आली होती. इंदिरा गांधी यांच्यावर 1977 च्या निवडणुकीत दोन कंपन्यांकडून जबरदस्ती 104 जीप घेण्याचा आरोप होता. याशिवाय फ्रान्स कंपनीला 1.34 करोड रुपये पेट्रोलियमचे कंत्राट देताना गडबड केल्याचा आरोप होता. 

"दोनच मिनिटांत तुझी नोकरी घालवतो'! विनामास्क दुचाकीस्वारांची पोलिस...

जेव्हा इंदिरा गांधी यांना अटक झाली, तेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांनी जमा होऊन घोषणाबाजी केली होती. 'लाठी गोली खाएंगे, इंदिराजी को लाएंगे, जेल हम जाएंगे, इंदिरा जी को लाएंगे', अशी घोषणा ते देत होते. कार्यकर्त्यांचा उस्ताह पाहून इंदिरा गांधी यांचीही हिंमत वाढली. त्यांनी सहकाऱ्यांनासोबत नवीन राजकीय रणनिती बनवली. पुढच्याच दिवशी इंदिरा गांधी यांना बिनशर्त जामीन मिळाला.  

1978 मध्ये जनता पार्टी सरकारे पुन्हा एकदा इंदिरा गांधी यांना अटक केली. त्यामुळे देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. इंदिरा गांधींनी काही काळातच लोकांमध्ये पुन्हा विश्वास जागवला होता. पाच दिवसांनी पुन्हा इंदिरा यांना जामीन मिळाला. 1977 मध्ये निवडणूक हरल्यानंतर पाच महिन्याने जेव्हा इंदिरा गांधी हत्तीवरुन बिहारमधील बेलछी नरसंहारातील पीडित दलित कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेल्या, त्यावेळी दलितांमध्ये याचा खास संदेश गेला होता. 

(edited by- kartik pujari)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com