'यूपी'त रस्त्यावर उतरले राहुल-प्रियांका; 'रोड शो'मुळे काँग्रेसची हवा!

वृत्तसंस्था
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

प्रियांका गांधी आज राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह लखनौमध्ये दुपारी आगमन झाले. त्यानंतर बनविण्यात आलेल्या विशेष रथावरून त्यांचा 15 किमीचा रोड शो सुरु झाला. चार दिवस त्यांचा मुक्काम येथेच असणार आहे. त्या प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.

लखनौ : काँग्रेसमधील नवे सत्ताकेंद्र असलेल्या प्रियांका गांधी आज (सोमवार) लखनौ दौऱ्यावर आल्या असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह त्या 15 किलोमीटरचा रोड शो करत आहेत. लखनौमध्ये पोस्टर्समधून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले असून, आ गई बदलाव की आँधी, राहुल संग प्रियांका गांधी असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

प्रियांका गांधी यांनी नुकतीच काँग्रेस मुख्यालयामध्ये सरचिटणीसपदाची औपचारिक जबाबदारी स्वीकारली होती. कार्यकर्त्यांशी संवाद साधून उत्तर प्रदेशात कामाला लागण्याचा संदेश त्यांनी दिला होता. तसेच त्यांनी रविवारी एक ऑडिओ मॅसेज पाठवून नव्या राजकारणाला सुरवात करण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला होता. प्रियांकांकडे पूर्व उत्तर प्रदेशातील 43 जागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

प्रियांका गांधी आज राहुल गांधी आणि ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासह लखनौमध्ये दुपारी आगमन झाले. त्यानंतर बनविण्यात आलेल्या विशेष रथावरून त्यांचा 15 किमीचा रोड शो सुरु झाला. चार दिवस त्यांचा मुक्काम येथेच असणार आहे. त्या प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. यानिमित्त काँग्रेसकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत असून, लखनौमधील काँग्रेस मुख्यालय झळाळून निघाले आहे.

Web Title: Congress General Secretary for Uttar Pradesh East Priyanka Gandhi Vadra, and party President Rahul Gandhi in Lucknow