...म्हणून काँग्रेसला 'प्राप्तिकर'ची नोटीस 

पीटीआय
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

- प्राप्तिकर विभागाने काँग्रेसला बजावली नोटीस.

नवी दिल्ली : हवालामार्फत हैदराबादच्या एका कंपनीकडून 170 कोटींची देणगी स्वीकारल्याचा ठपका ठेवत प्राप्तिकर विभागाने काँग्रेस पक्षाला नोटीस बजावली आहे. या देणगीबाबत पक्षाकडून कोणत्याही प्रकारचा हिशेब देण्यात आला नसल्याचे प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे. 3300 कोटींच्या हवालाप्रकरणी करचुकवेगिरी तपासाअंतर्गत प्राप्तिकर विभागाने नोटीस बजावली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

प्राप्तिकर विभागाने 2 डिसेंबर रोजी नोटीस बजावली असून, त्यात म्हटले आहे की, हैदराबाद येथील इन्फ्रास्ट्रक्‍चर कंपनीने हवालामार्फत कॉंग्रेसला 170 कोटी रुपये दिले आहेत. या कंपनीवरील छाप्यादरम्यान प्राप्तिकर विभागाला कॉंग्रेसशी झालेल्या व्यवहाराचा शोध लागला. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने 4 नोव्हेंबर रोजी कॉंग्रेस कार्यालयाच्या नेत्यांना समन्स बजाविले होते. यासंदर्भात कोणतेही उत्तर न आल्याने प्राप्तिकर विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Chandrayaan2:विक्रम लँडरचे तुकडे झालेले नाहीत; आशा कायम

दरम्यान, या प्रकरणातील व्यवहारासंदर्भात प्राप्तिकर विभागाने कॉंग्रेसचे काही पदाधिकारी आणि आंध्र प्रदेशातील एका राजकीय पक्षावर लक्ष ठेवले आहे. काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कंपनीकडून दीडशे कोटींची देणगी चंद्राबाबू नायडूंच्या टीडीपीला पाठविण्यात आली होती. या आधारावर प्राप्तिकर विभागाकडून टीडीपीलादेखील नोटीस बजाविण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress gets IT show cause notice over alleged Rs 170 cr black money