

Delhi Police Finally Grants 'NOC' to Congress; Mega Rally Against CEC Gyanesh Kumar at Historic Ramlila Maidan, Check Date!
Sakal
नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि 'वोट चोरी'च्या आरोपांवरून काँग्रेसने राजधानी दिल्लीत पुकारलेल्या देशव्यापी आंदोलनाला अखेर मोठी प्रशासकीय परवानगी मिळाली आहे. दिल्ली पोलिसांनी काँग्रेसच्या महारॅलीसाठी औपचारिक ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) जारी केले आहे. त्यानुसार आता दिल्लीतील ऐतिहासिक रामलीला मैदानावर काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीचा हा महाप्रचंड मेळावा येत्या २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.