
- नागरी संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर पूर्वेत्तर राज्यात हिंसाचार घडवून आणण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा करण्यात आला आरोप.
- तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची 20 ला बैठक
नवी दिल्ली/कोलकाता : नागरी संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर पूर्वेत्तर राज्यात हिंसाचार घडवून आणण्यास काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज सभागृहात केला. त्यामुळे कॉंग्रेसच्या खासदारांनी सभात्याग करत विधानाचा निषेध केला. तसेच लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी पूर्वेत्तर राज्यातील उसळलेल्या हिंसाचाराचा मुद्दा शून्यप्रहरात मांडला. पूर्वेतर राज्याचा काही भाग वगळता सर्वत्र आंदोलनाचा वणवा पेटला आहे, असे चौधरी म्हणाले.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. काश्मीरचाच फॉर्म्यूला पूर्वेत्तर राज्यात राबविला जात असल्याचे चौधरी म्हणाले. काश्मीर आणि आसाम हे दोन्ही भाग देशाच्या सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील भाग आहेत. त्यामुळे सरकारने गांभीर्याने हस्तक्षेप करून तेथे शांतता प्रस्थापित करावी. यावर उत्तर देताना संसंदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी पूर्वेत्तर राज्यात हिंसाचार भडकवण्याला काँग्रेसला जबाबदार धरले. कॉंग्रेसच्या या धोरणाचा जोशी यांनी निषेध केला.
Congress MPs Adhir Ranjan Chaudhry, K Suresh and Gaurav Gogoi have given Adjournment Motion Notice in Lok Sabha, over 'unrest in north eastern states & law & order situation'
— ANI (@ANI) December 12, 2019
दीपिका, कतरिना नाही तर 'ही' आहे आशियातली सर्वात सेक्सी महिला
जोशींच्या विधानांमुळे संतप्त झालेल कॉंग्रेसचे सदस्य सभागृह सोडून गेले. त्याच वेळी द्रमुकचे खासदारही बाहेर पडले. या दरम्यान शून्य प्रहरात तृणमूल कॉंग्रेसचे खासदार सौगत रॉय यांनी आसाम आणि त्रिपुरातील स्थितीचा मुद्दा मांडला आणि सरकारकडे निवेदनाची मागणी केली. त्यानंतर तृणमूलच्या खासदारांनीही सभात्याग केला.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांची 20 ला बैठक
लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नागरी संशोधन विधेयक (सीएबी) मंजूर झाल्यानंतर पूर्वेत्तर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यादरम्यान तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पक्ष खासदार आणि नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. प्रस्तावित बैठक 20 डिसेंबर रोजी होणार आहे.
या मंत्र्यांना मिळणार 'हे' खातं ; अखेर खातेवाटप जाहीर..
नागरी संशोधन विधेयक मंजूर झाल्यानंतर आसामसह अन्य पूर्वेत्तर राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहे. त्रिपुरा आणि आसामममध्ये काही ठिकाणी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी विधेयकाला विरोध केला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही केंद्र सरकारवर टीका सुरूच ठेवली आहे. सभागृहात तृणमूल कॉंग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी जोरदार विरोध केला. विधेयक मंजूर झाल्यानंतर पुढील रणनीती आखण्यासाठी तृणमूल कॉंग्रेसने नेत्यांची बैठक बोलावली आहे.
पक्ष सूत्राने दिलेल्या माहितीनुसार राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोरदेखील 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. 2021 रोजी पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक होत असून, त्यासाठी तृणमूल कॉंग्रेसने प्रशांत किशोर यांना रणनीतीसाठी पाचारण केले आहे.