Bharat Jodo Yatra : राहुल गांधींशी बोलणाऱ्यांवर 'आयबी'ची नजर; कॉंग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

congress jairam ramesh alleges ib interrogating people who met rahul gandhi during bharat jodo yatra
congress jairam ramesh alleges ib interrogating people who met rahul gandhi during bharat jodo yatra

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असेल्या भारत जोडो यात्रेबाबत काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी (25 डिसेंबर 2022) मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी संवाद साधणाऱ्या अनेकांची आयबी (IB) चौकशी करत असल्याचे जयराम रमेश म्हणाले आहेत. यावेळी जयराम रमेश यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले की, भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी संवाद साधणाऱ्या अनेकांची आयबी चौकशी करत आहे. जयराम रमेश म्हणाले की गुप्तहेरांकडून सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत आणि त्यांना सादर केलेल्या निवेदनाच्या प्रतींची मागणी देखील केली जात आहे. त्यांनी सांगितले की या भेटीबद्दल काहीही गुप्तता नाही, परंतु स्पष्टपणे मोदी आणि शहा (G2) घाबरले आहेत!

congress jairam ramesh alleges ib interrogating people who met rahul gandhi during bharat jodo yatra
आमदाराकडून 'छोटे सीएम' असा उल्लेख; श्रीकांत शिंदेंनी लावला डोक्याला हात.. पाहा Video

या दरम्यान शनिवारी (24 डिसेंबर 2022) काँग्रेसची भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल झाली होती. यादरम्यान, दिल्लीतील आश्रम चौकात पोहोचण्यापूर्वी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वड्रा यांच्यासोबत काही मिनिटे चालल्या. काँग्रेसच्या या भारत जोडो यात्रेत काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.

congress jairam ramesh alleges ib interrogating people who met rahul gandhi during bharat jodo yatra
Corona Outbreak : चीनमधून मायदेशी परतलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह, घर केलं सील

राहुल गांधींचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

यादरम्यान राहुल गांधी यांनी लाल किल्ल्यावरून भारत जोडो यात्रेला संबोधित करताना केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. हे नरेंद्र मोदींचे सरकार नाही , हे अदानी आणि अंबानींचे सरकार आहे असे राहुल गांधी म्हणाले होते. या दोघांच्या सांगण्यावरून सरकार चालत आहे. तसेच भाजप हिंदू धर्मावर बोलतो. हिंदू धर्मात कुठे लिहिले आहे की दुर्बलांना मारले पाहिजे, गरीबांना चिरडले पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com