
आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारे उत्तर प्रदेशातील भाजप नेते साक्षी महाराज यांनी काँग्रेस पक्षावर मोठा आणि गंभीर आरोप केला आहे
नवी दिल्ली- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असणारे उत्तर प्रदेशातील भाजप नेते साक्षी महाराज यांनी काँग्रेस पक्षावर मोठा आणि गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसने सुभाष चंद्र बोस यांना मारल्याचा दावा त्यांनी केला आहे. साक्षी महाराज यांनी एक सार्वजनिक रॅलीला संबोधित करताना म्हटलं की, माझा आरोप आहे की काँग्रेसने सुभाष चंद्र बोस यांची हत्या केली. महात्मा गांधी किंवा पंडित नेहरु दोघेही नेताजींच्या लोकप्रियतेसमोर टिकू शकले नाहीत. साक्षी महाराज उन्नावमधून भाजपचे खासदार आहेत.
शनिवारी नेताजी सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करण्यात आली. याप्रकरणी कोलकातामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी नेताजींविषयी गौरव शब्द वापरले.
'जय हिंद' किंवा 'वंदे मातरम' म्हणणं म्हणजे राष्ट्रवाद नाही...
मोदींच्या हस्ते यावेळी नेताजींना अभिवादन म्हणून विशेष नाणे आणि टपाल तिकिटाचे देखील अनावरण करण्यात आले. मोदी म्हणाले, ‘‘आजच्या दिवशी केवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला नव्हता तर भारताचा आत्मसन्मान जन्माला आला होता. याच नेताजींना जगाच्या महासत्तेला ठणकावून सांगितले होते की मी स्वातंत्र्य मागणार नाही तर ते हिसकावून घेईल.’’
#WATCH | "My allegation is that Congress got Subhash Chandra Bose killed....Neither Mahatma Gandhi nor Pandit Nehru could stand in front of his popularity," said BJP MP Sakshi Maharaj in Unnao yesterday pic.twitter.com/gaJJ6Le4j6
— ANI UP (@ANINewsUP) January 24, 2021
मोदी म्हणाले की, नेताजींचे नाव घेताच ऊर्जा संचारते. तसंच पश्चिम बंगालने देशाला अनेक नररत्ने दिली. येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांनी नेताजींचे स्मरण ठेवावे. संकटाच्या काळात नेताजी प्रेरणास्थान ठरतात. आता भारताला रोखणारी ताकद जगामध्ये नाही असंही मोदींनी सांगितलं. तसंच शोनार बांगला ही सर्वांत मोठी प्रेरणा असल्याचंही मोदी म्हणाले. आत्मनिर्भरतेचे मूळ नेताजींच्या शिकवणीत आहे असं मोदींनी सांगितलं.
हृदयाला स्पर्श करणारी घटना! काश्मिरी पंडिताच्या मृतदेहाला मुस्लीम शेजाऱ्यांनी...
दरम्यान, सुभाष चंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 साली ओडिशाच्या कटकमध्ये वकील जानकीनाथ बोस यांच्या घरी झाला. त्यांच्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आझाद हिंदी सेनेच्या स्थापनेसाठीही नेताजींची आठवण काढली जाते. 18 ऑगस्ट 1945 मध्ये ताईपेईमध्ये एका विमान दुर्घटनेत सुभाष चंद्र बोस यांचा मृत्यू झाला होता. मात्र, नेताजींचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला नसल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूप्रकरणी वाद आहे.