राजीव गांधीच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेवून राहुल गांधी करणार 'भारत जोडो'ला प्रारंभ

देशात नकारात्मक राजकारण केले जात असून जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर चर्चा होत नाही
rahul gandhi
rahul gandhi esakal

बुधवारी कन्याकुमारी येथील मेगा रॅलीतून काँग्रेस आपली 3,570 किमी लांबीची 'भारत जोडो यात्रा' सुरू करणार आहे. विचारधारा आणि आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण, आणि राजकीय केंद्रीकरणाच्या समस्यांविरुद्ध लढा म्हणून ही रॅली आयोजित करत, असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. भारत जोडो यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी श्रीपेरुंबदूर येथील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या समाधीस्थळी प्रार्थना सभेला उपस्थित राहणार आहेत.

त्यानंतर ते कन्याकुमारी येथे एका कार्यक्रमात सहभागी होणार आहेत, तिथे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उपस्थित राहणार आहेत. येथे राहूल गांधी यांच्याकडे खादीचा राष्ट्रध्वज दिला जाणार आहे.

पाच महिनांमध्ये 12 राज्ये आणि 2 केंद्र शासित प्रदेशातून जाणार यात्रा

महात्मा गांधी मंडपम मधील कार्यक्रमानंतर स्टॅलिन उपस्थित राहणार आहेत, राहुल गांधी आणि इतर काँग्रेस नेत्यांसह सार्वजनिक रॅलीच्या ठिकाणी जातील जिथे यात्रेची औपचारिक सुरुवात केली जाईल. प्रियांका गांधी वाड्रा यांनी एका व्हिडिओ सांगितल आहे की लोकांना शक्य असेल तेथे यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

rahul gandhi
स्वतंत्र्यानंतर चांगल्या सरकारी शाळा बनवल्या असत्या तर देश गरीब नसता- केजरीवाल

देशात नकारात्मक राजकारण केले जात असून जनतेच्या खऱ्या प्रश्नांवर चर्चा होत नसल्याने या भेटीची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. महागाई, बेरोजगारी यांसारख्या जनतेच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे हा यात्रेचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कन्याकुमारी ते श्रीनगर हा 3,570 किमीचा प्रवास, जो पाच महिन्यांत 12 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश करेल, या रॅलीमध्ये औपचारिकपणे प्रारंभ केला जाईल.

प्रत्यक्षात 8 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता राहूल गांधी आणि इतर अनेक काँग्रेस नेते पदयात्रेला सुरुवात करतील. यात्रा सुरू होण्यापूर्वी राहुल गांधी कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल, तिरुवल्लुवर पुतळा आणि कामराज मेमोरियललाही भेट देतील. यात्रेच्या अगोदर, राहुल यांनी रविवारी पक्षाच्या 'हल्ला बोल रॅली'मध्ये सांगितले की, सरकारने सर्व रस्ते बंद केले आहेत आणि काँग्रेसला आता जनतेत जाऊन सत्य सांगावे लागेल आणि म्हणूनच पक्ष 'भारत' जोडो यात्रा काढली आहे.

rahul gandhi
Witchcraft : जादूटोण्याच्या संशयावरून तीन महिलांची हत्या; ८ जणांना अटक

ते म्हणाले की, सरकारने आमच्यासाठी सर्व रस्ते बंद केले आहेत. काँग्रेस नेते, विरोधी पक्षनेते संसदेत भाषण करू शकत नाहीत, आमचा माईक बंद आहे, आम्हाला चीन हल्ल्याबद्दल बोलायचे आहे, पण आम्ही बोलू शकत नाही, आम्हाला बेरोजगारीबद्दल बोलायचे आहे, पण बोलू शकत नाही, मला महागाईवर बोलायचे आहे, ते ही बोलू शकत नाही.

पदयात्रा 2 गटात निघणार

पदयात्रा दोन गटामध्ये चालेल, एक सकाळी 7-10:30 आणि, दुसरा दुपारी 3:30 ते 6:30. सकाळच्या सत्रात कमी लोक सहभागी होणार असले तरी संध्याकाळच्या सत्रात मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. दररोज सरासरी 22-23 किमी चालण्याची योजना आहे. काँग्रेसने दावा केला आहे की, काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास कोणत्याही प्रकारे ‘मन की बात’ नसून लोकांच्या चिंता आणि मागण्या दिल्लीपर्यंत पोहोचतील याची खात्री करणे हा आहे. पक्षाने राहुल गांधींसह 119 नेत्यांना 'भारत यात्री' म्हणून वर्गीकृत केले आहे, जे कन्याकुमारी ते श्रीनगर हे संपूर्ण अंतर पूर्ण करतील.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com