मोदींवर टीका करणाऱ्या काँग्रेस खासदाराचे निलंबन मागे; लवकरचं लोकसभा सदस्यत्व होणार बहाल

भाजप आणि मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावाच्यावेळी कथित गैरवर्तन केल्याप्ररणी अधीर रंजन चौधरी यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते.
narendra modi
narendra modiANI

Adhir Ranjan Chaudhary:लोकसभेत काही दिवसांपुर्वी भाजप आणि नरेंद्र मोदी सरकारवर विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव आणला गेला होता. त्यावेळी लोकसभेच्या विशेषाधिकार समितीने काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांचे निलंबन केले होते.

आता लोकसभेच्या या समितीने बुधवारी (दि. ३० ऑगस्ट) काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी आपली बाजू मांडल्यावर त्यांच निलंबन रद्द करण्याची शिफारस मंजूर केली आहे. अविश्वास प्रस्तावाचे समर्थन करताना चुकीच्या वर्तानाचा अरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी विशेषाधिकार समितीकडे धाव घेतली होती.

लोकसभेच्या अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितले होते की काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे खासदार अधीर रंजन चौधरी बुधवारी विशेषाधिकार समितीसमोर हजर होणार आहेत, पुढच्या काही दिवसात त्यांना खासदारकी बहाल केली जाईल.

लोकसभेचे अधिकारी म्हणाले की पॅनलने चौधरी यांचं निलंबन रद्द करुन त्यांना खासदारकी पुन्हा बहाल करावी यासाठी ओम बिरला यांच्याकडे शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता. चौधरी यांना कथितरित्या जाणूनबुजून शिष्टाचाराचं उल्लंघन केल्या प्रकरणी १० ऑगस्टला त्यांना लोकसभेतून निलंबित करण्यात आले होते.(Latest Marathi news)

narendra modi
INDIA Meeting: इंडिया आघाडीची ताकद वाढली! आणखी दोन पक्षांचा समावेश; पटोलेंनी सांगितली उद्याच्या बैठकीची रुपरेषा

निलंबनाच्या कारवाईनंतर अधीर रंजन चौधरी म्हणाले की सभागृहातून निलंबित करणे गरजेचे नव्हते आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता. चौधरी म्हणाले की त्यांनी केलेली विधानं जर चुकीची होती, तर ती हटवताही आली असती.(Latest Marathi news)

संसदेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, "हाऊस पॅनेल लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचा प्रयत्न करेल." पॅनेलची 30 ऑगस्ट रोजी पुन्हा बैठक होईल आणि या विषयावरील ही शेवटची बैठक असू शकते."

narendra modi
Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीत आहेत का ? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com