गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! वाघेलांनंतर 'या' आमदारानं दिला राजीनामा

Ashwin Kotwal
Ashwin Kotwalesakal
Summary

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील राजकारण चांगलंच तापलंय.

गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Gujarat Assembly Election) पार्श्वभूमीवर राजकारण शिगेला पोहोचलंय. इथं विरोधी पक्ष काँग्रेसला मोठा झटका बसलाय. खेडब्रम्हाचे काँग्रेस आमदार (Congress MLA) अश्विन कोतवाल (Ashwin Kotwal) यांनी आज (मंगळवार) गुजरात विधानसभेचा राजीनामा दिला असून काही तासांत ते भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोतवाल यांच्या राजीनाम्यामुळं विधानसभेतील विरोधी पक्ष काँग्रेसचं संख्याबळ 63 वर पोहोचलंय. तर, विधानसभेत सत्ताधारी भाजपचं संख्याबळ 111 वर (BJP MLA) आहे.

खेडब्रम्हामधील आदिवासी काँग्रेसचे आमदार अश्विन कोतवाल यांनी आज सकाळी गुजरात विधानसभेच्या अध्यक्षा नीमाबेन आचार्य (Nimaben Acharya) यांच्याकडं आपला राजीनामा सुपूर्द केला. दरम्यान, गुजरात भाजपचे मुख्यालय श्री कमलम इथं भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. सुखराम राठवा यांना विरोधी पक्षनेते बनवल्यानं कोतवाल संतप्त होते, असं मानलं जातंय.

Ashwin Kotwal
'धर्मनिरपेक्षतेवर बुलडोझर चालवून भाजप देशात अनेक मिनी पाकिस्तान बनवतंय'

अश्विन कोतवाल यांच्या निकटवर्तीयांचं म्हणणं आहे की, कोतवाल लवकरच भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. अश्विन कोतवाल 6 एप्रिल रोजी सीआर पाटील यांच्या सभेत त्यांच्या समर्थकांसह सहभागी होणार आहेत. यादरम्यान कोतवाल भाजपचं सदस्यत्व घेतील. याआधी काँग्रेसचे माजी आमदार मणिलाल वाघेला (Manilal Vaghela) यांनी या वर्षी डिसेंबरमध्ये होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अनेक समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केलाय. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं त्यांना तिकीट नाकारलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com