पोलिसांच्या धक्काबुक्कीत पी चिदंबरम यांची बरगडी फ्रॅक्चर, कॉंग्रेस नेत्याचा दावा

congress leader claims p chidambarams rib fractured pushed by cops
congress leader claims p chidambarams rib fractured pushed by cops

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी आज दावा केला की, काँग्रेसच्या निषेधादरम्यान पोलिसांनी माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्याशी झटापट केली. ज्यामध्ये त्याचा चष्मा जमिनीवर फेकला गेला, त्याच्या डाव्या बरगडीला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. खासदार प्रमोद तिवारी यांना देखील रस्त्यावर फेकले गेल्याचे असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याही डोक्याला दुखापत आणि बरगडी फ्रॅक्चर झाली असल्याचेही सुरजेवाला यांनी सांगितले. सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडी) राहुल गांधी हजर झाल्यानंतर पक्षाने काढलेल्या निषेध मोर्चात पोलिसांच्या झटापटीत त्यांचे अनेक नेते जखमी झाल्याचा काँग्रेसचा दावा आहे.

प्रमुख विरोधी पक्षा काँग्रेसच्या या दाव्यावर दिल्ली पोलिसांकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक व्हिडीओ जारी करून म्हटले आहे की, दिवसभर काँग्रेस नेत्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. खासदार शक्तीसिंह गोहिल यांच्यावर हल्ला झाला. काँग्रेस कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली.

मोदी सरकारने रानटीपणाची हद्द ओलांडली आहे, असा दावाही त्यांनी केला. माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांच्याशी पोलिसांची झटापट, चष्मा जमिनीवर फेकण्यात आला, त्यांच्या डाव्या बरगडीला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. खासदार प्रमोद तिवारींना रस्त्यावर फेकले गेले. डोक्याला दुखापत आणि बरगडी फ्रॅक्चर झाली आहे. पुढे बोलतांना सुरजेवाला यांनी ही लोकशाही आहे का? निषेध करणे गुन्हा आहे का?, असा प्रश्नही विचारला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com