Kangana Ranaut TweetESakal
देश
Kangana Ranaut: मोदींचे मित्र ट्रम्प यांना भाजप घाबरतो का? कंगना राणौत यांचे 'ते' ट्विट डिलीट; काँग्रेस नेत्यानं घेरलं
Kangana Ranaut Tweet: खासदार कंगना राणौत त्यांच्या स्पष्टवक्त्या विधानांसाठी ओळखली जातात. कंगना अनेकदा सोशल मीडियावरील तिच्या पोस्टमुळे चर्चेत येतात. आता अलीकडेच पुन्हा असेच काहीसे पाहायला मिळाले आहे.
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप खासदार कंगना रनौत यांना सोशल मीडियावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात पोस्ट केल्याबद्दल मोठी किंमत मोजावी लागली. कंगना यांना ती पोस्ट तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून काढून टाकावी लागली. नंतर त्यांनी दुसरी पोस्ट करून पोस्ट का डिलीट केली हे स्पष्ट केले.