

Congress Leader Murder Case
Esakal
बंगळूर, ता. ८ : उडुपी जिल्ह्याच्या कापू तालुक्यातील मुदरंगडी पेठेत काँग्रेस नेते डेव्हिड डिसोझा यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशातील शूटर राजू याला उडुपी जिल्हा पोलिसांनी गोळीबार करून अटक केली. पोलिसांच्या गोळीबारात राजूच्या उजव्या पायाला गोळी लागली असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे.