esakal | 'कृषी कायदे दिल्लीत नव्हे, मुंबईत तयार झाले'; दिग्विजय सिंहांचा रोख कुणाकडे?
sakal

बोलून बातमी शोधा

Digvijay_Singh

दिग्विजय सिंह यांचा रोख नक्की कुणाकडे होता याबाबत उलटसुलट चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.

'कृषी कायदे दिल्लीत नव्हे, मुंबईत तयार झाले'; दिग्विजय सिंहांचा रोख कुणाकडे?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांबाबत राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी गेल्या २ महिन्यांपासून ठिय्या मांडला आहे. शेतकरी आणि सरकार यांच्यामधील दरी वाढतच चालली आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी राज्यसभेत केलेल्या वक्तव्यामुळे विरोधक चांगलेच खवळले आहेत. कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसने सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी तोमर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, नरेंद्रसिंह तोमर हे चांगले व्यक्ती आहेत, पण त्यांना शेतीबद्दल काहीच माहिती नाही, दुसरे पीयुष गोयल ते कॉर्पोरेट क्षेत्राचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की नवे कृषी कायदे हे दिल्लीत नव्हे तर मुंबईत तयार केले गेले आहेत. 

पुण्याचे दोन नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी 

दिग्विजय सिंह यांचा रोख नक्की कुणाकडे होता याबाबत उलटसुलट चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. तोमर सांगतात की ते शेती करतात, पण तोमर यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये शेतजमीनीचा उल्लेखच नाही, त्यामुळे तोमर नक्की कोणत्या प्रकारची शेती करतात हे समजून घ्यावं लागेल, असा चिमटाही दिग्विजय सिंहांनी तोमर यांना काढला आहे.

"बाहेरच्या सेलिब्रिटींनी ट्विट केल्यावर जाग आली का?", अजित पवारांचा बॉलिवूडकरांना सवाल

त्याआधी कृषिमंत्री तोमर म्हणाले होते की, काळा कायदा म्हणून ज्या कायद्याला संबोधित केलं जात आहे. त्यामध्ये नक्की चुकीचं काय आहे, हे सांगायला कुणी नाही. जर कायदा चुकीचा आहे, तर चर्चा करा, पण दुर्दैवाने हे घडताना दिसत नाही. सर्वपक्षीय नेत्यांना तसेच शेतकऱ्यांनाही खुल्या चर्चेसाठी बोलावण्यात आलं आहे. आम्ही पुन्हा चर्चेसाठी तयार आहोत.

दरम्यान, काँग्रेस फक्त रक्ताची शेती करू शकतं भाजप नाही, या वक्तव्यामुळे तोमर विरोधकांच्या टीकेचं लक्ष्य बनले होते.

- Farmers Protest: दिल्ली, यूपी आणि उत्तराखंडमध्ये चक्काजाम नाही : राकेश टिकैत

- देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)