Election: काँग्रेसचा कार्यकर्ता स्पीकर घेऊन थेट भाजपच्या सभेत, ऐकवलं विश्वजित कदमांचं भाषण...

Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे
Karnataka Election 2023
Karnataka Election 2023Esakal

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. कर्नाटकात एकाच टप्प्यात निवडणूक होणार आहेत. कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार आहे.

तर 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. कर्नाटकमध्ये सभा, प्रचार यांचा धुरळा उडाला आहे. अशातच प्रचारादरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघाच्या काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आ.अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जांबोटी या गावामध्ये सभा आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळी जवळच भाजपची देखील सभा होती यावेळी काँग्रेसचा कार्यकर्ता थेट स्पीकर घेऊन भाजपच्या सभे शेजारी उभा राहिला. काँग्रेसची होणारी ही सभा भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ऐकावी म्हणून हा कार्यकर्ता खांद्यावर स्पीकर घेऊन फिरत होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Karnataka Election 2023
Anil Patil Resigns: मोठी बातमी! अनिल पाटील यांचा आमदारकीचा राजीनामा

राज्यात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी

कर्नाटकात एकाच टप्प्यात मतदान आहे. राज्यात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. कर्नाटक राज्यातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत.

राज्यभरात 58,282 मतदान केंद्रे उभारणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे. कर्नाटक विधानसभेची सदस्यसंख्या 224 इतकी आहे. सत्तेत येणाऱ्या पक्षाकडे 113 आमदारांचं संख्याबळ असणं गरजेचं आहे.

Karnataka Election 2023
Nana Patole: 'आमच्या पक्षात चोंबडेपणा करू नये', नाना पटोलेंनी राऊतांना दिली तंबी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com