'तेरा भक्त तुझको बुला रहा',कन्हैय्या कुमारचं उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी हवन

Delhi Lok Sabha Election : उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर कन्हैय्या कुमार यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Kanhaiya Kumar files nomination
Kanhaiya Kumar files nomination

उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर कन्हैय्या कुमार यांना आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांनी रोड शो देखील केला. त्यांच्या या रोड शो मध्ये बुलडोझर देखील पाहायला मिळाले. कन्हैयाने यापूर्वी बुलडोजरच्या राजकारणावरून सत्ताधारी भाजपवर अनेक वेळा टीका देखील केली आहे.

कन्हैया कुमार यांचा अर्ज भरण्यासाठी काँग्रेस, आप आणि सीपीआयएमसह इंडिया आघाडीमधील अनेक बडे नेते सहभागी झाले होते. पूर्व दिल्लीत लोकसभा जागेवर कन्हैया कुमार यांचा सामना भाजपचे बडे नेते आणि दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले मनोज तिवारी यांच्याशी आहे. मनोज तिवारी यांनी याआधीच आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

काँग्रेस नेते कन्हौया कुमार यांनी पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरण्याआधी हवन केले. याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी सांगितलं की त्यांना सर्व धर्मांच्या गुरुंनी संविधानाची प्रस्तावना भेट देऊन आणि दुआ केली तसेच आशीर्वाद दिले.

Kanhaiya Kumar files nomination
आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

दिल्लीत सर्व सात लोकसभा मतदारसंघात सहव्या टप्प्यात २५ मे रोजी निवडणूक होणार आहे. यावेळी दिल्लीत आप आणि काँग्रेस इंडिया आघाडीअंतर्गत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत, काँग्रेस तीन - चांदणी चौक, उत्र पूर्व दिल्ली आणि उत्तर पश्चिम दिल्ली जागेवरून निवडणुक लढवत आहे. तर आप चार - नवी दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली आणि पूर्व दिल्ली या मतदारसंघात निवडणूक लढवत आहे.

Kanhaiya Kumar files nomination
Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com