esakal | विराट अनुष्काचा कुत्रा म्हणणाऱ्या नेटकऱ्यांना काँग्रेस प्रवक्त्याचे खडे बोल, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

virat kohli.

या व्हिडीओमध्ये विराटने भारतीयांना फटाके न फोडण्याचंही आवाहन केलं होतं.

विराट अनुष्काचा कुत्रा म्हणणाऱ्या नेटकऱ्यांना काँग्रेस प्रवक्त्याचे खडे बोल, म्हणाले...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : क्रिकेटर असो वा फिल्म स्टार... एका टप्प्यानंतर याचं खाजगी आयुष्य हे खाजगी न राहता सार्वजनिक चर्चेचा विषयच बनून जातं. बरेचदा त्यांचे चाहते हेच त्यांच्या बदनामीचे कारण ठरतात. त्यांच्याविषयीची दिशाहीन चर्चा ही त्यांच्या खाजगी आयुष्याचीही सीमा पार करुन जाते. असंच सध्या घडतंय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत. विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तिथून कोहलीने भारतीय लोकांना दिवाळीच्या सदिच्छा देणारा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्याने भारतीयांना फटाके न फोडण्याचंही आवाहन केलं होतं. विराटच्या या म्हणण्यावर काही लोकांनी टीका केली आहे. यातच आता भाजपचे माजी खासदार आणि सध्या काँग्रेसचे प्रवक्ते असणाऱ्या डॉ. उदीत राज यांनी विराटच्या समर्थनार्थ शड्डू ठोकला आहे. 

काही लोकांनी आपली पातळी सोडत ही टीका केलीय. ट्विटरवर त्याच्यावर टीका करताना त्याची पत्नी अनुष्का शर्मा हीला देखील लोकांनी यात ओढलं आहे. ट्विटरवर अनेक लोकांनी #अनुष्का_तेरा_कुत्ता_संभाल हा हॅश्टॅग शेअर केला आहे. विराट आणि अनुष्कावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जात आहे. यातच आता भाजपचे माजी खासदार आणि सध्या काँग्रेसचे प्रवक्ते असणाऱ्या डॉ. उदीत राज यांनी विराटच्या समर्थनार्थ शड्डू ठोकला आहे. 

हेही वाचा - बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी सिमल्यात मजा करत होते, आरजेडी नेत्याचा आरोप
त्यांनी या टिकाकारांना त्यांच्याच भाषेत खडे बोल सुनावले आहेत. प्रदुषणामुळे मानवता धोक्यात असताना विराटचं हे म्हणणं काही चुकीचं नसल्याचं त्यांनी म्हटलंय. अश्लिल भाषेत टीका करणाऱ्यांबाबत सरकार गप्प का? असा सवाल त्यांनी केलाय. तसेच ही टीका करणारे लोक इथलेच आहेत का? असा सवालही त्यांनी केलाय. त्यांचं  हे ट्विट सध्या चर्चेत आहे. 

हेही वाचा - कोलकत्यात दिवाळीत प्रदूषणात घट

आयपीएलचा तेरावा सीझन संपल्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला 27 नोव्हेंबर पासून सुरवात होत आहे. या दौऱ्यात तीन वनडे आणि टी-ट्वेंटी तसेच चार कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. मात्र, पहिला कसोटी सामना संपल्यानंतर विराट आपली पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी काळजी घेण्यासाठी म्हणून पुन्हा भारतात परतणार आहे. यावरुन देखील विराटवर टीका करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवरच फटाके वाजवू नये या चांगल्या संदेशाचाही काही नेटकऱ्यांनी आगपाखड करत समाचार घेतला आहे. 

loading image
go to top