भेटीआधी ममता बॅनर्जी सोनिया गांधींना देणार धक्का; काँग्रेस नेत्याचा TMC प्रवेश? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ममता बॅनर्जी भेटीआधी सोनिया गांधींना देणार धक्का

ममता बॅनर्जी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याआधीच ममता दीदी काँग्रेसला मोठा धक्का देऊ शकतात.

ममता बॅनर्जी भेटीआधी सोनिया गांधींना देणार धक्का

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. ममता बॅनर्जी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, त्याआधीच ममता दीदी काँग्रेसला मोठा धक्का देऊ शकतात. काँग्रेस नेते आणि माजी खासदार किर्ती आझाद हे आज काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत हा प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माजी क्रिकेटपटू असलेले किर्ती आझाद हे २६ वर्षे भाजपमध्ये होते. त्यानतंर तीन वर्षांपूर्वी किर्ती आझाद यांनी भाजपमधून काँग्रेस प्रवेश केला होता. भाजपचे माजी मुख्यमंत्री भागवत झा यांचे पूत्र असलेल्या किर्ती आझाद हे दिल्लीतून एकदा आमदार आणि दरभंगामधून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत.

हेही वाचा: दीड वर्षानंतर देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या निच्चांकी

किर्ती आझाद हे १९८३ च्या वर्ल्ड कप क्रिकेट टीममधील सदस्य होते. वडिल काँग्रेसमधील दिग्गज नेते असताना त्यांनी मात्र भाजपमधून राजकीय कारकिर्द सुरु केली होती. अरुण जेटलींसोबत वादानंतर त्यांनी २०१९ च्या लोकसभे आधा भाजपला रामराम केला होता. २०१९ च्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर मैदानात उतरले होते. मात्र त्यांना पराभव सहन करावा लागला. दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव चर्चेत होते मात्र तसं काही न झाल्यानं ते नाराज असल्याचंही म्हटलं जातंय.

loading image
go to top