हिंदू धर्माचं पालन करणारे ८० टक्के लोक भाजपसाठी खरे भारतीय - मणिशंकर अय्यर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mani Shankar Aiyer

''हिंदू धर्माचं पालन करणारे ८० टक्के लोक भाजपसाठी खरे भारतीय''

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर (Congress Leader Mani shankar Aiyer) यांनी हिंदू धर्म (Hindu religion) आणि हिंदूत्वावरून (Hindutva) भाजपवर टीका केली आहे. ''हिंदू धर्माचे पालन करणारे फक्त ८० टक्के लोकच भाजपसाठी (BJP) खरे भारतीय आहेत'', असं वक्तव्य अय्यर यांनी केलं आहे. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

हेही वाचा: नातेवाईक स्वीकारणार मिलिंद तेलतुंबडेचा मृतदेह, वणीमध्ये आज अंत्यसंस्कार

''हिंदू धर्म आणि हिंदूत्वामध्ये फरक आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. तो फरक हाच आहे की जे हिंदू धर्मावर विश्वास ठेवतात ते शंभर टक्के भारतीय आहेत. आपण या देशात राहणाऱ्या प्रत्येकाला भारतीय मानतो. पण, सत्तेत बसलेले लोक असं मानत नाहीत. ते हिंदू धर्माचं पालन करणाऱ्या ८० टक्के लोकांनाच खरे भारतीय मानतात'', असं मणिशंकर अय्यर म्हणाले.

राहुल गांधींनीही केली होती टीका -

गेल्या आठवड्यात, काँग्रेस नेते राहुल गांधींनी देखील हिंदू धर्म आणि हिंदूत्वावरून भाजप-आरएसएसच्या विचारसरणीवर टीका केली होती. या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे ते म्हणाले होते. "हिंदू धर्म म्हणजे शीख किंवा मुस्लिमांना मारहाण करणे आहे का? हिंदूत्वामध्ये अर्थातच ते आहे. ते कोणत्या पुस्तकात लिहिलेले आहे? मी ते पाहिले नाही. मी उपनिषद वाचले आहेत. हिंदू धर्म आणि हिंदूत्व यात काय फरक आहे? ते एकच आहेत का? ते एकच असू शकतात का? जर ते एकच आहेत, तर त्यांचे नाव एकच का नाही? त्यांचे वेगळे नाव का आहे? तुम्ही हिंदूत्व हा शब्द का वापरता? साहजिकच त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत'', असं राहुल गांधी म्हणाले होते.

loading image
go to top