esakal | तमीळनाडूत दिलखुलासपणे नाचत, व्यायाम करत राहुल गांधींचा प्रचार; जिंकली उपस्थितांची मने
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी सध्या तीन दिवसांच्या तमीळनाडूच्या प्रचार दौऱ्यावर आहेत.

तमीळनाडूत दिलखुलासपणे नाचत, व्यायाम करत राहुल गांधींचा प्रचार; जिंकली उपस्थितांची मने

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तमीळनाडू : काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी सध्या तीन दिवसांच्या तमीळनाडूच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. येत्या काही आठवड्यांवरच तमीळनाडूसह देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. यामध्ये तमीळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश आहे. या पाचही राज्यांच्या निवडणुकीचं वेळापत्रक शनिवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलं आहे. 

यावेळी राहुल गांधींनी भारतीय जनता पक्षावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाचा प्रचार केला आहे. हे करताना त्यांनी अगदी सहजतेने लोकांमध्ये मिसळून हा प्रचार केला आहे. यावेळी ते तमिळ लोकांसोबत नाचताना, बागडताना तसेच व्यायाम करताना देखील दिसत आहेत. 

हेही वाचा - VIDEO : पहा भगतसिंह, टिळक आणि विवेकानंदांचे हुबेहुब हावभाव; AI टेक्निकची अद्भूत कमाल

यावेळी ते तमिळनाडूतील सेंट जोसेफ्स मॅट्रीक्यूलेशन सेकंडरी स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसोबत नाचताना दिसून आले. तसेच ते यावेळी मुलांसोबत 'ऐकीडो' खेळताना आणि पुश-अप्स मारताना दिसून आले. ते सहजपणे विद्यार्थ्यांची, युवकांची आणि लोकांची भेट घेत आहेत. अगदी परवाच त्यांचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला होता. ज्यामध्ये एका मुलीला सही दिल्यानंतर ती उत्साहीत झाली. त्यानंतर राहुल गांधींनी तिला निखालसपणे मिठी मारत तिच्यासोबत फोटोही काढला होता. 

यावेळी भाजप सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटलंय की, ज्या शक्ती 'एक संस्कृती, एक देश आणि एक इतिहास' संकल्पना पुढे आणून वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतीविषयी शत्रूत्व राखतात त्यांना लांब ठेवून तमिळनाडूने भारताला दिशा दाखवली पाहिजे. कन्याकुमारी बोलताना ते म्हणाले की, तमिळ व्यक्तीशिवाय तमिळनाडूवर कुणीही राज्य करु शकत नाही हे इतिहासाने दाखवून दिलं आहे. आणि आताची निवडणूक सुद्धा हेच दाखवून देईल, असं ते म्हणाले.