Vidhan Sabha 2019 : राहुल गांधींचा 'करिष्मा' विधानसभेत दिसणार?

टीम ई-सकाळ
Wednesday, 9 October 2019

- राहुल गांधी येणार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी

- 13 ऑक्टोबरला येणार मुंबई दौऱ्यावर.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आता मुंबई दौरा होणार आहे. राहुल गांधी येत्या 13 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. याबाबतची माहिती आज (बुधवार) देण्यात आली.

महाराष्ट्र आणि हरियाना राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या. तसेच महाराष्ट्रातील विविध पक्षांच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. तर दुसरीकडे भाजपने प्रचारासाठी आता कंबर कसली आहे. मात्र, यामध्ये काँग्रेसचे वरिष्ठ नेते असलेले राहुल गांधी हे कुठंही दिसत नव्हते किंवा त्यांचे नावही कुठं घेतले जात नव्हते. याशिवाय राहुल गांधी बँकॉक दौऱ्यावर गेले. त्यामुळे ते महाराष्ट्रात प्रचारासाठी येणार की नाही, अशी विचारणा केली जात होती. मात्र, आता राहुल गांधी प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

I Will Vote : चला, जागतेपणाने मतदान करू या...! 

दरम्यान, राहुल गांधी मुंबई दौऱ्यावर येणार असल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होणार आहे.

Vidhan Sabha 2019 : आता महायुतीच्या नेत्यांनी राजकीय वजन दाखवावे : मुख्यमंत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress Leader Rahul Gandhi will be Present for Maharashtra Election Campaign