I Will Vote : चला, जागतेपणाने मतदान करू या...! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 ऑक्टोबर 2019

कोल्हापूर - "मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो...' अशी साद घालत आज शनिवारी हजारो कोल्हापूरकरांनी "चला, जागतेपणाने मतदान करू या' असा वज्रनिर्धार केला. ऐतिहासिक बिंदू चौकाच्या साक्षीने झालेल्या या मोहिमेत हजारो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा सक्रीय सहभाग राहिला.

कोल्हापूर - "मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो...' अशी साद घालत आज शनिवारी हजारो कोल्हापूरकरांनी "चला, जागतेपणाने मतदान करू या' असा वज्रनिर्धार केला. ऐतिहासिक बिंदू चौकाच्या साक्षीने झालेल्या या मोहिमेत हजारो महाविद्यालयीन तरूण-तरूणींचा सक्रीय सहभाग राहिला.

एकमेकांच्या हातात हात गुंफून त्यांनी "आय विल व्होट'चा नारा दिला आणि सारा परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. "सकाळ माध्यम समूह' आणि जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने हा उपक्रम झाला. दरम्यान शाहिरी, पथनाट्य, विविध प्रबोधनपर फलक, पोस्टर्सनी या उपक्रमाची उंची आणखी वाढवली. 

I will Vote : कोल्हापुरातील बिंदु चाैकात मानवीसाखळी 

"सकाळ' व जिल्हा प्रशासनाने आवाहन केल्यानंतर लोकशाहीच्या या उत्सवात समाजातील सर्वच घटकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हातात हात गुंफत मानवी साखळी करताना वाहतुकीस कोणताही अडथळा होणार नाही, याची खबरदारीही घेण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतदानाचा आदर्श देण्याचा संकल्प यावेळी झाला.

चला मतदान करूया... 

जिल्हाधिकारी दौलत देसाई, सकाळ माध्यम समूहाचे संपादक संचालक श्रीराम पवार, अभिनेता आनंद काळे, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, शिक्षण उपसंचालक डॉ. अजय साळी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमन मित्तल, निवडणूक उपजिल्हाधिकारी सतीश धुमाळ, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शनी मोरे आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते.

"सकाळ'चे निवासी संपादक निखिल पंडितराव, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांनी स्वागत केले. संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले. 

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी ही राज्याच्या तुलनेत अधिक होती. आगामी विधानसभा निवडणुकीतही ही परंपरा कायम राखताना मतदानाचा टक्का आणखी वाढवू या. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी नवमतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा. 
- दौलत देसाई,
जिल्हाधिकारी 

सकाळ समूह केवळ कोल्हापुरातच नव्हे तर राज्यभरात हा उपक्रम राबवतो. त्याला तरूणाईचा मोठा प्रतिसादही मिळतो आहे. येत्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नवमतदार मोठ्या संख्येने लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होणार आहेत आणि मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 
- श्रीराम पवार,
संपादक - संचालक, सकाळ माध्यम समूह 

मानवी साखळीत सहभाग

एकूण नागरिक - 10 हजार 

महाविद्यालये - 21

संस्था, संघटना - 15 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: I Wll Vote Event in Kolhapur by Sakal