56 इंच छाती दाखवा : सुरजेवाला 

Randeep Surjewala
Randeep Surjewala

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही या भ्याड हल्ल्याचा निषेध करताना सरकारवर टीकाही केली. गेल्या पाच वर्षांतील हा 17 वा मोठा हल्ला आहे. सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांवर सरकारला नियंत्रण आणता आलेले नाही. आता तरी मोदी सरकारने 56 इंची छाती दाखवावी, असे आवाहन सुरजेवाला यांनी केले. 

पुलवामामध्ये 42 केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांचा बळी घेणाऱ्या आत्मघातकी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा आणि सरकारच्या पातळीवर प्रचंड अस्वस्थता आहे. या भ्याड हल्ल्यानंतर सरकार आक्रमक झाले असून, दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्युत्तर मिळेल, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे. 

उरी येथील हल्ल्यानंतर लष्कराने पाकिस्तानी हद्दीत "सर्जिकल स्ट्राइक' करून दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त केले होते. त्यामुळे पुलवामातील भयंकर हल्ल्यानंतरही अशा प्रकारच्या कारवाईसाठी सरकारवर दबाव वाढला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे बलिदान व्यर्थ जाणार नसल्याचा सूचक इशारा दिला आहे.

कॉंग्रेसने या हल्ल्याचा निषेध करताना मोदी सरकारला लक्ष्य केले. पक्षाध्यक्ष राहुल गांधींनी या भेकड हल्ल्यामुळे जोरदार धक्का बसल्याचे म्हटले असून, हौताम्य पत्कराव्या लागलेल्या जवनांच्या कुटुंबीयांबद्दल राहुल यांनी सहवेदना व्यक्त केल्या आहेत. देशसेवेसाठी आणि जम्मू-काश्‍मीरमधील दहशतवाद संपविण्यासाठी जाणाऱ्या तरुणांना प्राण गमवावे लागले आहेत. या हल्ल्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे, असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com