सचिन पायलट यांना मोठी जबाबदारी मिळणार? सोनिया गांधीच्या भेटीनंतर चर्चांना उधाण

पायलट यांची नेमकी भूमिका काय असेल याचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्षा घेतील असे सूत्रांनी सांगितले.
Sachin Pilot
Sachin PilotSakal

नवी दिल्ली : राजस्थान काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी सोनिया गांधी यांची आज भेट घेतली असून, या भेटीदरम्यान पायलट यांनी आपल्याला राजस्थानचे मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केल्याचे सांगितले जात आहे. अशोक गेहलोत यांच्या जागी सचिन पायलटने यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केल्याच्या बातम्या येत असताना ही बैठक झाली आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पायलट यांची नेमकी भूमिका काय असेल याचा अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्षा घेतील असे सूत्रांनी सांगितले.

2018 मध्ये राजस्थान विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून काँग्रेस सत्तेत परतली तेव्हा सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्यावेळी उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे, असा दबाव त्यांच्यावर त्यावेळी टाकण्यात आला होता. या बैठकीत राज्यातील पक्षांतर्गत सचिन पायलट यांची भविष्यात काय भूमिका असेल यावरही चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. सचिन पायलट हे राजस्थान काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री होते. पण 2020 मध्ये त्यांनी पक्षाविरोधात बंड केल्याने त्यांना दोन्ही पदे गमवावी लागली होती. दरम्यान, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत पायलट यांच्या या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर राजस्थान काँग्रेसमध्ये पायलट यांची नेमकी भूमिका काय असेल, म्हणजेच त्यांच्यावर कोणती जबाबदारी सोपवली जाईल, हे पक्षाध्यक्ष लवकरच ठरवतील, असे बोलले जात आहे.

सीएम गेहलोत यांनीही घेतली सोनियांची भेट

तत्पूर्वी बुधवारी सीएम गेहलोत यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस हायकमांड सचिन पायलट यांना राज्यात मोठी जबाबदारी देऊ शकते, असा अंदाजही वर्तवला जात आहे. पायलट यांना पुन्हा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष केले जाण्याची शक्यताही काही राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुका पायलट यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या. पण पायलट मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मागे पडले आणि अशोक गेहलोत राज्याचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com