Congress: काँग्रेस नेते सचिन पायलटांचं मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर टीकास्त्र; सोनिया नव्हे वसुंधरा राजे...

काँग्रेस आमदारांनी राजस्थानातील सरकार उलथून टाकण्यासाठी भाजपकडून पैसे घेतल्याचा आरोप गेहलोत यांनी केला होता
Congress
CongressEsakal

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या ढोलपूरमधील भाषणातून त्यांच्या नेत्या या सोनिया गांधी नसून भाजपच्या वसुंधरा राजे असल्याचे दिसते, असे टीकास्त्र काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी आज सोडले.

आपल्याविरुद्ध २०२० मध्ये बंड केलेल्या काँग्रेस आमदारांनी राजस्थानातील सरकार उलथून टाकण्यासाठी भाजपकडून पैसे घेतल्याचा आरोप गेहलोत यांनी केला होता. मात्र, भाजप नेत्या वसुंधरा राजे व कैलाश मेघवाल यांनी पैशाचा वापर करून राज्य सरकार पाडण्याच्या कटात सहभागी होण्यास नकार दिला होता. या आमदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पैसे परत करायला हवेत, असेही गेहलोत आपल्या भाषणात म्हणाले होते. मात्र, आपण काँग्रेसमधील ज्या असंतुष्ट आमदारांच्या गटाचे नेतृत्व केले होते, त्यांनी भाजपकडून पैसे घेतल्याचा आरोप पायलट यांनी फेटाळला.

राजस्थानचे मुख्यमंत्री असताना वसुंधरा राजे यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी आपण केली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गेहलोत यांच्या ढोलपूरमधील भाषणाबाबत पत्रकारांशी बोलताना पायलट म्हणाले, की मुख्यमंत्री गेहलोत यांचे हे भाषण ऐकल्यानंतर असे वाटते की, सोनिया गांधी त्यांच्या नेत्या नसून वसुंधरा राजे आहेत.

गेहलोत यांच्या भाषणातील विरोधाभास निदर्शनास आणत पायलट पुढे म्हणाले, की भाजपने आपले सरकार पाडण्याच्या कट रचला आणि त्याचवेळेस वसुंधरा राजे यांनी ते वाचविण्यासाठी मदत केल्याचा गेहलोत यांच्या दाव्यात विरोधाभास आहे. नेमके काय म्हणायचे आहे, हे त्यांनी स्पष्ट करायला हवे.

Congress
Amit Shah: अमित शहांना सुप्रीम कोर्टाचा मोठा धक्का; या प्रकरणी दर्शवली नाराजी

आपल्याच पक्षातील नेत्यावर आरोप करणे चुकीचे, निषेधार्ह. मी हे खोटे व निराधार आरोप नाकारतो. जर पुरावे होते तर मुख्यमंत्री गेहलोत यांनी त्याचवेळी कारवाई करायला हवी होती. असे आरोप करण्यात काही अर्थ नाही. आपल्याला गद्दार, कोरोना, निकम्मा म्हटले गेले. मात्र, घटनाक्रमावरून कोण पक्ष बळकट करत आहे आणि कोण कमजोर हे स्पष्ट होते.

दरम्यान, भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी ११ मे रोजी अजमेर ते जयपूर अशी जनसंघर्ष यात्रा काढण्याची घोषणाही पायलट यांनी यावेळी केली. जुलै २०२० मध्ये पायलट यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधील १८ आमदारांनी गेहलोत यांचे नेतृत्व नाकारण्याच्या मागणीसाठी बंड केले होते.

Congress
Amol Kolhe: “भावी मुख्यमंत्री जयंत पाटील...”, म्हणणाऱ्या अमोल कोल्हेंनी केले अजित पवारांचं कौतुक

पायलट म्हणाले...आरोप करणे सोपे असते मात्र लोकांना उत्तर देण अवघड गेहलोत ज्या आमदारांविरुद्ध आरोप करत आहेत, ते ३० पेक्षा अधिक वर्षांपासून राजकारणात काहीजणांना काँग्रेस कमकुवत करून चारित्र्यहनन करायचे आहे, मात्र मी हे होऊ देणार नाही. आरोप केल्यानंतरही मी पक्षाची शिस्त मोडली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com