नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर (Shashi Tharoor) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५ टक्के अतिरिक्त कर लादण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयाला थरूर यांनी अन्यायकारक, दुटप्पी आणि भारत-अमेरिका संबंधांना धक्का देणारा ठरवले आहे.