
‘सोनिया गांधी व राहुल गांधी यांना काहीही झाले तर देश पेटेल’
नागपूर : नॅशनल हेराल्ड प्रकरणी राहुल गांधी यांची ईडीसमोर तीन दिवसांपासून चौकशी होत असल्याने काँग्रेस नेते संतापले आहेत. काँग्रेस नेते रस्त्यावर उतरून हिंसक आंदोलन करीत आहे. निदर्शनादरम्यान नेते आणि पोलिसांमध्ये चकमकही होत आहे. दरम्यान, सोनिया गांधी आणि राहुल गांधी (rahul gandhi) यांना काहीही झाले तर ते देश पेटवून देऊ, असे काँग्रेस नेते शेख हुसैन म्हणाले. (congress leader Sheikh Hussein said , If anything happens to Sonia and Rahul, the country will burn)
जे काम करायचे आहे ते बाजूला ठेवून मोदी सरकार अनावश्यक काम करीत आहे. या वक्तव्यामुळे शेख हुसैन यांच्याविरुद्ध नागपूरमधील (Nagpur) गिट्टीखदान पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरुद्ध कलम २९४ आणि ५०४ आयपीसी अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
हेही वाचा: मोमोज खायला आवडते? मग एम्सने दिलेला हा इशारा वाचा
काँग्रेसचे (congress) लोक हिंसक झाले आहेत. आता ते पंतप्रधानांनाही ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. ते महात्मा गांधींच्या नावाने निदर्शने करण्याचे कसे बोलत आहे? अहिंसेचा संबंध महात्मा गांधींशी आहे आणि हे लोक हिंसा करीत आहे, असे भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले.
शेख हुसैन यांना पश्चाताप नाही
मला माझ्या वक्तव्याचा कोणताही पश्चाताप नाही. नरेंद्र मोदींवर केवळ म्हण म्हणून टिप्पणी केली होती. याला चुकीच्या पद्धतीने घेतले जात आहे. मी म्हण म्हणून जे बोललो त्याला वेगळ्याच पद्धतीने सादर केले जात आहे, असे आपल्या वक्तव्यावर शेख हुसैन (Sheikh Hussein) म्हणाले.
Web Title: Congress Leader Sheikh Hussein Said If Anything Happens To Sonia And Rahul The Country Will Burn
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..