मोदी तुम्हाला लाज वाटली पाहिजे : सिद्धरामय्या

siddaramaiha modi
siddaramaiha modi

बंगळूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव न घेता अपमानास्पद शब्दांत टीका केली होती. यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदींना अशा खालच्या पातळीचे वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे अशा कठोर शब्दांत टीका केली आहे. 

सिद्धरामय्या यांनी मोदींवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा व्हिडिओ पाहिला. यामध्ये ते डिस्लेक्सिया असलेल्या व्यक्तींबाबत असंवदेनशील बोलत होते. तुम्हाला लाज वाटली पाहिजे, इतक्या खालच्या पातळीवर तुम्ही जाऊ शकत नाही.

तुम्ही इतके असंवेदनशील आहात, तुम्ही कोणत्याही नदीत स्नान केले तरी ते धुतले जाणार नाहीत. डिस्लेक्सिया पीडित लोकांना शिकण्याची किंवा ग्रहण करण्याची क्षमता कमी असली तरी ते इतके असंवेदनशील नसतात, असे ते ट्विटमध्ये म्हणाले.

मोदी हे एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी 'डिस्लेक्सिया' या आजारावर बोलत होते. यावेळी एका विद्यार्थीनीने 'डिस्लेक्सिया' असलेल्या मुलांची लिहिण्याची आणि शिकण्याची क्षमता कमी असली तरी, ते बुद्धिमान आणि सृजनशील असतात, असे सांगितले. यावेळी मोदी यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता म्हटले की, मग 40-50 वर्षाच्या मुलासाठीही ही योजना काम करेल, असा टोला लगावला. त्यांच्या या उत्तरावर उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये हसू पिकले. 

मोदी हे Smart India Hackathon 2019 साठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. याचदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. आता काँग्रेसने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com