
कर्नाटकाच्या राजकारणात दबदबा असलेले नेते बी. एस. येडियुरप्पा यांनी मोठी घोषणा केली होती; पण..
निवडणूक लढवणार नाही म्हणणाऱ्या येडियुरप्पांनी घेतला यू-टर्न; म्हणाले, माझ्या मुलाला..
बंगळुरू : कर्नाटकाच्या (Karnataka) राजकारणात दबदबा असलेले नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांनी शुक्रवारी मोठी घोषणा केली होती. त्यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला असून मुलाला मतदारसंघ सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election) लढवणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, उमेदवारीच्या घोषणानंतर त्यांनी यू-टर्न घेतला असून भाजप हायकमांड जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, असं त्यांनी जाहीर केलंय.
विजयेंद्र यांना भाजपकडून (BJP) सातत्यानं डावललं जात असल्याची तक्रार येडियुरप्पा यांच्या कार्यकर्त्यांकडून सातत्यानं केली जात होती. त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेती संधी मिळेल, अशी चर्चा होती. पण, त्यांचा भ्रमनिरास झाला. सध्या ते भाजपचे राज्य उपाध्यक्ष आहेत. त्यातच येडियुरप्पांनी केलेल्या घोषणेनंतर चांगलीच चर्चा रंगली होती.
हेही वाचा: निष्ठा असावी तर अशी! मुस्लीम मावळ्यानं उद्धव ठाकरेंसाठी चक्क रक्तानं लिहिलं पत्र
येडियुरप्पा म्हणाले, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष बी. विजयेंद्र (B. Vijayendra) यांच्याकडं कुठूनही निवडणूक जिंकण्याची क्षमता आहे, पण अंतिम निर्णय हा पक्षाच्या हायकमांडचा आहे. शिवमोग्गामधील शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघातून (Shikaripura Assembly Constituency) आठ वेळा आमदार राहिलेले येडियुरप्पा पुढं म्हणाले, 'मी पुढील विधानसभा निवडणूक लढवणार नाही. मात्र, पक्षाच्या हायकमांडला माझ्या मुलाला उमेदवारी देण्यास सुचवणार आहे.'
हेही वाचा: ..तिच्याकडून चूक झाली असावी; स्मृती इराणींच्या मुलीचं प्रियंका चतुर्वेदींनी केलं समर्थन
यापूर्वी येडियुरप्पांनी आपण निवडणूक लढवणार नसून आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचं सांगितलं होतं. मी निवडणूक लढवत नाही, पण विजयेंद्र शिकारीपुरा येथून निवडणूक लढवणार असल्याचं ते म्हणाले होते. मी शिकारीपुरातील लोकांना माझ्यापेक्षा मोठ्या फरकानं माझ्या मुलाला विजयी करावं, यासाठी हात जोडून प्रार्थना करतो, असंही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा: 'ते' परत येतील म्हणत बसण्यापेक्षा त्यांना श्रद्धांजली वाहा, रावतेंचा शिंदे गटावर हल्ला
हायकमांड त्यांना (विजयेंद्र) जिथं लढायला सांगेल, तिथं विजयेंद्र लढायला तयार आहेत. भगवंताच्या कृपेनं सर्वत्र विजय मिळवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात आहे आणि त्यानुसारच त्यांनी आपलं व्यक्तिमत्त्व घडवलंय. मात्र, अंतिम निर्णय पंतप्रधानांचाच असेल. मी फक्त सुचवू शकतो. आम्ही त्यांच्या (पंतप्रधानांच्या) निर्णयावर ठाम राहू, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
Web Title: Karnataka Bs Yeddyurappa U Turn Announcing Son Vijayendra Contest Election Shikaripura Assembly Constituency
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..