'आपले पंतप्रधान बोलतात पोपटासारखं'

दावल इनामदार
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

सध्या कोण काम करतंय आणि कोण नाही हे माहीत असते. मात्र, कोण पोपटपंची करून भाषण करून जातो? आपल्या देशाचे पंतप्रधान पोपटासारखं बोलतात.

- सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते 

ब्रह्मपुरी(सोलापूर) : सध्या कोण काम करतंय आणि कोण नाही हे माहीत असते. मात्र, कोण पोपटपंची करून भाषण करून जातो? आपल्या देशाचे पंतप्रधान पोपटासारखं बोलतात. पण खाली काय नाही? तुमच्या तालुक्यातही पोपटपंची आहेत, असे असे माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आज (रविवार) सांगितले. .

मंगळवेढा येथे आमदार भारत भालके यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य सर्वरोग निदान शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते. शिंदे म्हणाले, की मोठ्या शहरांमध्ये आजाराचे पॅकेज असतात. त्यातून वर्षातून रोग तपासणी केली जाते. परंतु ज्यानं रोग आहे त्यांनी तपासावे असे नाही. ज्यांना आजार नाही त्यांनीही व्याधीचे निदान करून घेणे गरजेचे आहे. या शिबिरास तालुक्यातून चांगल्या प्रकारच्या नावाजलेल्या डॉक्टरांना बोलावून शिबिर घेतले. सर्व रोग निदान शिबिरात रोग तपासणी करणे गरजेचे आहे. 

ते पुढे म्हणाले, एखाद्या राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठे हारतूरे व भेटवस्तू येतात. तो दिवस निघून जातो. पण, आरोग्य शिबीर भरवणे आपल्या बंधू-भगिनींना सोबत घेऊन वेगळ्या प्रकारचे तत्वज्ञान देणे खऱ्या अर्थाने सेवा देणे. हे एक चांगल्या प्रकारची आमदार भालके याना भेट आहे.

यावेळी वाढदिवसानिमित्त सर्व रोगनिदान शिबिर कार्यक्रमनिमित्त माजी आमदार राजन पाटील, भगीरथ भालके यांनी मनोगत व्यक्त केले 

यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, रतनचंद शहा, अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, नगरसेवक चेतन नरोटे, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, काँग्रेस समितीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, सुरेश कोळेकर, अजित जगताप, प्रवीण खवतोडे, सचिन शिंदे, राहुल सावंजी, युवराज शिंदे, युवराज घुले, डॉ प्रवीण सारडा, डॉ नंदकुमार शिंदे, डॉ. सुमेध अंदूरकर, डॉ.आसावरी घोडके, डॉ. देवदत्त पवार, डॉ. प्रसाद कोरुलकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

दरम्यान, शहरासह तालुक्यातून मोठ्या संख्येने विविध रुग्णांनी हजेरी लावली. उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांनी प्रस्ताविक केले. इंद्रजित घुले यांनी सूत्रसंचालन केले. संदीप घुले यांनी आभार मानले.

Web Title: Congress Leader Sushilkumar Shinde Criticizes PM Narendra Modi