'..तर आमची घरं जाळतील'; पाकिस्तानच्या कर्णधाराची ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला 'मॅच फिक्सिंग' करण्याची ऑफर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shane Warne

कारकिर्दीत वादात सापडलेल्या वॉर्नची निवृत्तीनंतरही सुटका होऊ शकली नाही.

पाकिस्तानच्या कर्णधाराची ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाला 'मॅच फिक्सिंग'ची ऑफर

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा (Australia) महान गोलंदाज शेन वॉर्न (Shane Warne) क्रिकेटच्या मैदानावर खूप गाजला. मैदानाबाहेरही तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत राहिलाय. कारकिर्दीत वादात सापडलेल्या वॉर्नची निवृत्तीनंतरही सुटका होऊ शकली नाही. पुन्हा एकदा वार्न चर्चेत आला असून यावेळी त्यानं मॅच फिक्सिंगबाबत (Match fixing) खळबळजनक दावा केलाय. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान आपल्याला 'लाच' देऊ केल्याचा आरोप त्यानं केलाय.

वॉर्नला या सामन्यात खराब कामगिरी करण्यास सांगितलं होतं, असं त्याचं म्हणणं आहे. अॅमेझॉन प्राइमवरील 'शेन' (Shane) या आगामी माहितीपटात त्यांनी याचा धक्कादायक खुलासा केलाय. वॉर्ननं म्हटलंय, की 1994 मध्ये पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध कराचीत (Karachi) खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याला 2 लाख 76 हजार डॉलरची लाच ऑफर करण्यात आली होती आणि ही ऑफर पाकिस्तानचा कर्णधार सलीम मलिकनं (Salim Malik) दिली होती. सलीम मलिकनं त्याला मला भेटायचंय, असं सांगितलं होतं.

हेही वाचा: ऑस्कर जिंकणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय अभिनेत्याचं निधन

अनुभवी गोलंदाज म्हणाला, मलिकला मी भेटला आणि दोघंही सामन्याबद्दल बोलू लागलो. मी म्हणालो, मला वाटतं उद्या आपण जिंकू. यानंतर पाकिस्तानी क्रिकेटर म्हणाला, आम्ही हारू शकत नाही. तुम्हाला माहीत नाही, आम्ही घरच्या मैदानावर हरलो, तर आमची घरं जाळतील, असं त्यानं वॉर्नला सांगितलं. यानंतर मलिकनं मला आणि माझ्या सहकाऱ्यांना लाच देऊ केली, असं वॉर्नर म्हणाला. मलिकचं हे ऐकून मला आश्चर्य वाटलं आणि आम्ही ही माहिती कॅप्टन मार्क टेलर (Mark Taylor), प्रशिक्षक बॉब टेलर यांना दिली. त्यानंतर हे प्रकरण मॅच रेफरीपर्यंत पोहोचलं. 2000 मध्ये मलिकवर आजीवन बंदी घालण्यात आली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top