प्रियांका म्हणते, 'You will always be my Hero'

priyanka gandhi
priyanka gandhi

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची आज (ता. 19) 28वी पुण्यतिथी. आज सकाळी राजीव गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या वीरभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वद्रा, त्यांचे पती रॉबर्ट वद्रा, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंह व काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. 

राजीव गांधी यांचे पुत्र व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी व प्रियांका गांधी यांनी भावनिक ट्विट करत राजीव गांधींना अदरांजली वाहिली आहे. 'माझे वडील मृदू स्वभावाचे, प्रेमळ, दयाळू आणि प्रेमळ होते. त्यांनी मला सर्वांवर प्रेम करण्यास आणि आदर करण्यास, तसेच माफ करण्यास शिकवले. आज मला त्यांची आठवण येते. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी प्रेम व आदरांजली व्यक्त करतो.' असे राहुल यांनी ट्विट केले आहे. तर प्रियंका गांधी यांनी 'तुम्ही नेहमीच माझ्यासाठी हिरो असाल' असे ट्विट करत आदरांजली व्यकत् केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही 'माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त आदरांजली' असे ट्विट करत श्रद्धांजली व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com