Election Results : पाच राज्यांचे आमदार एकत्र केले तरी होत नाही काँग्रेसची सेंच्यूरी | Congress Lost 5 States Assembly Elections | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress Lost 5 States Assembly Elections

Election Results: पाच राज्यांचे आमदार एकत्र केले तरी होत नाही काँग्रेसची सेंच्यूरी

Assembly Election Results 2022 : देशात आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपुर आणि उत्तराखंड या राज्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या एकूण सर्व निवडणूक निकालांमध्ये सर्वात जास्त चर्चा होतेय की, आम आदमी पक्षाच्या विजयाची. पंजाबमध्ये (Punjab) आम आदमी पक्ष तब्बल ९० जागांवर आघाडीवर आहेत. यापूर्वी १२ जागा मिळवलेल्या आम आदमी पक्षाने एवढी मोठी मुसंडी मारल्याने पंजाबमध्ये सत्तापालट होणार आहे. तर दुसरीकडे ७७ आमदार असलेल्या काँग्रेसला (Congress) दारून पराभव स्विकारावा लागला आहे. एकूण पाच राज्यांत मिळून देखील काँग्रेसला शंभरी पार करता आलेली नाही.

हेही वाचा: पाच राज्यांच्या निकालांवर शरद पवारांचं भाष्य; आम आदमी पक्षाचं केलं कौतुक

पंजाब वगळता इतर सर्व राज्यांत देखील काँग्रेसची अशीच अवस्था आहे. काँग्रेस पंजाबमध्ये १७, उत्तराखंडमध्ये २५, उत्तरप्रदेशमध्ये २, मणिपूर ९ तर गोव्यात १२ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेस सध्याच्या स्थितीनुसार ६९ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसला एकूण ६९ जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय.

हेही वाचा: स्टँड-अप कॉमेडियन ते 'आप'चा मुख्यमंत्री पदाचा चेहरा; भगवंत मान यांचा रंजक प्रवास

दरम्यान, पाच राज्यांपैकी पंजाबच्या ११७, उत्तर प्रदेशच्या ४०३, उत्तराखंडच्या ७०, मणिपूर ६०, गोवा ४० अशा एकूण ६९० पैकी फक्त ६९ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला आहे. त्यामुळे काँग्रेसने फक्त १० टक्के जागांवरच विजय मिळवला आहे. एकूणच देशातील या पाच राज्यांतील निवडणुकांपैकी एकाही राज्यात काँग्रेसला सत्ता मिळवता आली नाही. दरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी हा पराभव आम्ही स्विकारत असल्याच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. तर काँग्रेसला आप हाच पर्याय असल्याचं मत आपने व्यक्त केलं आहे.

Web Title: Congress Lost Five States Assembly Elections 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sonia GandhiRahul Gandhi
go to top