स्टँड-अप कॉमेडियन ते 'आप'चा मुख्यमंत्री पदाचा चेहरा; भगवंत मान यांचा रंजक प्रवास

अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आपच्या पंजाबसाठी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याची घोषणा केली.
Bhagwant Mann
Bhagwant MannTeam eSakal

पंजाबमध्ये विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पक्षाने (AAP) आपला मुख्यमंत्रीपदाचं नाव जाहीर केलं आहे. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये (Punjab) शक्ती पनाला लावली आहे. आम आदमी पक्षाला गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त जागा मिळण्याची शक्यता असल्याने, त्यांना तसाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणं देखील गरजेचं होतं. त्यामुळे आपने सर्वेच्या माध्यमातून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडला. अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार २५ लाख लोकांपैकी ९३ टक्के लोकांनी एका नावावर शिक्कामोर्तब केला. ते नाव म्हणजे खासदार भगवंतसिंग मान (Bhagwant Mann) . कधीकाळी कॉमेडीयन म्हणून देशभरात प्रसिद्ध असलेल्या भगवंतसिंग मान यांचा आज पर्यंतचा प्रवास रंजक आहे.

Bhagwant Mann
मुख्यमंत्रीपदासाठी नाव घोषित झाल्यानंतर भगवंत मान म्हणाले...

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला एका अशा नेत्याची गरज होती, जो मोठ्या प्रमाणात गर्दी खेचून आणू शकेल. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी भगवंतसिंग मान यांच्याकडे यापूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी मोठी जबाबदारी दिली होती. आज मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले मान यांनी २०११ साली पिपल्स पार्टी ऑफ पंजाबप्रवेश करत आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात केली होती. यापूर्वी ते स्टँडअप कॉमेडीयन म्हणून देशभरात प्रसिद्ध होते. लाफ्टर चॅलेंज स्टाप प्लसवरील कार्यक्रमातून त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली होती. पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पुढे मार्च २०१४ मध्ये त्यांनी आपमध्ये प्रवेश केला. यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी संगरुर मतदार संघातून तब्बल २ लाख मतांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला. त्यानंतर २०१९ साली झालेल्या निवडणुकांमध्येही मान हे आपमधलं मोठं नाव होतं.

Bhagwant Mann
मुख्यमंत्री चन्नी यांच्या कुटुंबीयांवर ईडीचे छापे, राजकीय वातावरण तापलं

मान हे अतिशय जमीनीवर राहणारे नेते असल्याचं संगरूरच्या भासौर गावातील गावातील लोक सांगतात. तर त्यांच्यामुळेच आम्हाला मतदार आणि नागरिक म्हणून आमच्या हक्कांची माहिती मिळाली असं लोक म्हणतात. यावरून मान यांची नागरिकांमध्ये असलेली लोकप्रियता दिसून येते.

मान यापूर्वी काही वादात देखील अडकले आहेत. संसदेच्या नियमांचं उल्लंघन करत मद्यधुंद अवस्थेत सभागृहात हजेरी लावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यानंतर मान यांनी दोन वर्षांपूर्वी बर्नाळा येथे एका जाहीर सभेत मद्यसेवन न करण्याती प्रतिज्ञा केली होती. त्यानंतर 2015 मध्ये, मान आणि त्यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यांना दोन मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा असून, ते परदेशात राहतात.

Bhagwant Mann
प्रजासत्ताक दिनी PM मोदींना धोका, सुरक्षा यंत्रणांना 'हायअलर्ट'

दरम्यान, यावेळी भगवंतसिंग मान यांच्यासमोरचं आव्हान मोठं आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतांची विभागणी जास्त असणार आहे. त्यामुळे आता आपला जास्तीत जास्त मतं मिळवून देण्याचं आवाहन मान यांच्यासमोर असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com