वाढत्या कोरोना संसर्गामुळे काँग्रेसच्या सभा रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

covid-19
वाढत्या कोरोना संसर्गामुळे काँग्रेसच्या सभा रद्द

वाढत्या कोरोना संसर्गामुळे काँग्रेसच्या सभा रद्द

नवी दिल्ली : काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi)यांनी कोरोनाच्या (Corona)वाढत्या रुग्णसंख्येमुळे पक्षाच्या प्रचारसभा रद्द करण्याचा निर्णय घेतला.यासंदर्भात भाजपवर (BJP)टीका करताना त्या म्हणाल्या की, निवडणुकीपूर्वी (Election)विमानतळांचे उद््घाटन करून राज्याचा विकास होत नसतो. बेरोजगार युवक. शेतकरी, महिला आणि गरीब संकटात सापडले आहेत. विकास त्यांच्यापर्यंत पोचलेला नाही.

हेही वाचा: खाकी वर्दीवर रक्ताचा डाग; मद्यधुंद अवस्थेत डिलिव्हरी बॉयला उडवलं

त्यांनी पुढे सांगितले की, आरोग्याच्या बाबतीत उत्तर प्रदेश तळात आहे. महिलांच्या आरोग्याची स्थिती तर आणखी वाईट आहे. आम्ही सत्तेवर आलो तर राज्यातील डॉक्टरांची सर्व रिक्त पदे भरू. प्रत्येक आरोग्य केंद्रात महिलांसाठी वेगळे डॉक्टर असतील. प्रत्येक कुटुंबाला एक लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार पुरविले जातील.

हेही वाचा: अखेर लसीकरण प्रमाणपत्रावरुन हटवला जाणार PM मोदींचा फोटो

महिला सबलीकरणाबाबत त्यांनी सांगितले की, एका गॅस सिलिंडरची ही पद्धत आधी थांबली पाहिजे. त्याऐवजी महिलांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, सुरक्षा या गोष्टी कशा मिळतील हे महत्त्वाचे आहे. महिलांसाठी ४० टक्के आरक्षण हे खरे प्रतिनिधित्व नसून हे प्रमाण ५० टक्के हवे.प्रियांका यांनी जाहिरनाम्यात महिला विकासाचा मुद्दा ठळकपणे मांडला आहे. विद्यार्थिनी, गृहिणी यांच्यासाठी आर्थिक मदत, स्कुटी, टॅब अशा आश्‍वासनांची खैरात करण्यात आली आहे.

पिडीतांच्या हालांमुळे घोषवाक्य

प्रियांका यांनी `लडकी हूँ, लड सकती हूँ‘ असे घोषवाक्य तयार केले आहे. महिला शक्ती एकवटण्याचा निर्धार त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांच्या हालामुळे हे घोषवाक्य सुचले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top