पक्ष गेला तेल लावत ; काँग्रेस आमदाराचा घरचा आहेर

MLA Jeetu Patwari Criticizes Congress
MLA Jeetu Patwari Criticizes Congress

नवी दिल्ली : मध्यप्रदेशातील राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेस आमदाराने आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. ''पक्ष गेला तेल लावत माझ्याकडे लक्ष द्या'', असे वक्तव्य त्यांनी केले. काँग्रेस आमदार जीतू पटवारी यांनी याबाबत वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आमदार पटवारी हे मध्यप्रदेशातील राऊ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-काँग्रेसकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. असे असताना काँग्रेसच्याच आमदाराने आपल्याच पक्षाला घरचा आहेर दिला. राऊ येथील एका जनसंपर्क अभियानादरम्यानचा पटवारी यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, ''तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला माझी अब्रू राखायची आहे. पक्ष गेला तेल लावत''. पटवारी यांच्या या विधानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याकडून यावर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केले जात आहेत.

दरम्यान, यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी एक विधान केले होते. त्यानंतर पटवारी यांनी हे विधान केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com