चिनी सैन्याने 5 भारतीयांचे अपहरण केल्याचा दावा; काँग्रेस आमदाराने थेट PM मोदींकडे केली तक्रार

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 5 September 2020

अरुणाचल प्रदेशमधून चिनी सैनिकांनी पाच भारतीयांचे अपहरण केल्याचे वृत्त समोर येत आहे. येथील काँग्रेस पक्षाचे स्थानिक आमदार निनॉन्ग एरिंग  यांनी हा दावा केला आहे. चीन पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागातून पाच भारतीयांचे अपहरण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारत आणि चीन दोन्ही राष्ट्रांत सीमारेषेवर तणावाचे वातावरण आहे.  शांततेच्या मार्गाने दोन्ही देशांतील वादग्रस्त मुद्यावर तोडगा काढण्यासाठी भारत सकारात्मक आहे. पण चीनकडून सकारात्मकता दाखवून कुरघोडी करण्याचा प्रकार घडत आहे. सीमारेषेवरील तणाव टोकाच्या पातळीवर जातानाचे चित्र दिसत असताना यात आता आणखी भर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अरुणाचल प्रदेशमधून चिनी सैनिकांनी पाच भारतीयांचे अपहरण केल्याचे वृत्त समोर येत आहे. येथील काँग्रेस पक्षाचे स्थानिक आमदार निनॉन्ग एरिंग  यांनी हा दावा केला आहे. चीन पीपल्स लिबरेशन आर्मीने अरुणाचल प्रदेशच्या सीमाभागातून पाच भारतीयांचे अपहरण केल्याचे त्यांनी म्हटले आहे. पूर्वी लडाखमध्ये दोन्ही देशात तणावपूर्ण वातावरण असताना समोर येणारे वृत्त दोन्ही देशातील तणाव आणखी तापण्याचे संकेत देणारे आहे.   

अग्रलेख : उजेडाची झाडे

अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेस आमदार निनॉन्ग एरिंग यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विट अंकाउंटला टॅग करत एक ट्विट केले आहे. यात त्यांनी अरुणाचल प्रदेशमधील सुबनसिरी जिल्हातील पाच नागरिकांचे चिनी सैन्याने अपहरण केल्याचा दावा केला आहे. काही महिन्यांपूर्वी अशाच प्रकारची घटना घडली होती, असा उल्लेखही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. या प्रकरणाकडे लक्ष देऊन भारत सरकारने योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेस आमदाराकडून करण्यात आली आहे. त्यांनी आपल्या ट्विटसोबत काही स्क्रीनशॉट देखील शेअर केले आहेत. यात एका युजर्सने आपल्या भावाचे अपहरण झाल्याचा उल्लेख केल्याचे पाहायला मिळते. तर दुसऱ्या स्क्रीनशॉमध्ये पाच लोकांचे अपहरण झाल्याचा उल्लेख दिसून येतो.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

15 जून रोजी भारत-चीन सैन्यामध्ये हिंसक झडप झाली होती. यात भारताचे 20 जवानांना हुतात्म्य पत्करावे लागले होते. यावेळी जवळपास 80 चीनी सैनिकांचा देखील मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. या घटनेनंतर दोन्ही राष्ट्रांतील तणावपूर्ण परिस्थिती अद्यापही कायम आहे. भारताने चीनची घुसघोरी रोखण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा सीमारेषेवर तैनात केला आहे. शिवाय चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न देखील सुरु आहे.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Congress MLA Ninong Ering Claims Five people from Arunachal Pradesh have reportedly been abducted by China People Liberation Army