Video : 'मुघलांनी भारताला आकार दिला, मला त्यांचा अभिमान', काँग्रेस खासदाराचं वादग्रस्त विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Red Fort

Video : 'मुघलांनी भारताला आकार दिला, मला त्यांचा अभिमान', काँग्रेस खासदाराचं वादग्रस्त विधान

मुगलांनी छोट्या छोट्या राज्यांची निर्मिती करून भारताला हिंदुस्तानचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे मला मुघलांचा अभिमान आहे, असे वादग्रस्त विधान आसाममधील बारपेटा मतदारसंघाचे लोकसभा खासदार अब्दुल खालिक यांनी केले आहे. तथापि, मी मुघल नाही किंवा मी त्याचा वंशज नाही. त्यांनी हिंदुस्थानला एक आकार दिला आहे. मुघलांशिवाय देशाचा स्वातंत्र्यलढा अपूर्ण राहिला असता असेही खालिफ यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

...तर लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे योग्य नाही

भारतात लाल किल्ला, ताजमहाल यांसारखी स्मारके बांधली त्यामुळे मुघलांचे देशासाठीचे योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. देशाचा प्रत्येक पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकावतो यावरून मुघलांचे महत्त्व लक्षात येते. मुघलांचा एवढा द्वेष असेल तर, लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे योग्य होणार नाही, असेही खालिफ यांनी म्हटले आहे.

सीएम हिमंता बिस्वा यांना मुघलांची अॅलर्जी

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांच्यावर निशाणा साधत खालिक म्हणाले की, आमच्या मुख्यमंत्र्यांना मुघलांची अॅलर्जी आहे. मात्र, मुघल काळापासून दिल्ली ही भारताची राजधानी होती, असा दावाही त्यांनी केला. हे उघडपणे व्यक्त करणे विचित्र वाटत असले तरी हे वास्तव आहे असेही खालिफ यांनी म्हटले आहे.

Web Title: Congress Mp Abdul Khaliq Says I Am Proud Of The Mughals

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..