Congress MP K Sudhakaran in Dubai ICU
esakal
लोकसभेत सोमवारी 'मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर महत्त्वाची चर्चा आणि मतदान होणार आहे. त्याआधीच काँग्रेसचे खासदार के. सुधाकरन भारताबाहेर गेले असून, सध्या त्यांना दुबईतील एका रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेससह इंडिया आघाडीची चिंता वाढली आहे. दरम्यान, सुधाकरन यांच्या कुटुंबीयांनी आणि केरळ काँग्रेसने यामागे कट असल्याचा संशय व्यक्त करत केंद्रातील भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.