

Congress MP Renuka Chowdhury arriving at Parliament with her pet dog
esakal
Congress MP Renuka Chowdhury arriving at Parliament with her pet dog : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या आज (सोमवार) पहिल्याच दिवशी काँग्रेस खासदार रेणुका चौधरी एका अनोख्या वादात सापडल्या आहेत. कारण, त्या त्यांच्या पाळीव श्वानासह संसदेत पोहोचल्या. त्यांच्या अशाप्रकारे आगमनामुळे व याचा व्हिडिओही समोर आल्याने खळबळ उडाली. भाजपने याला संसदेच्या प्रतिष्ठेचे उल्लंघन असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली.
याबाबत जेव्हा मीडियाने रेणुका चौधरी यांना प्रश्न विचारले तेव्हा, त्यांनी पलटवार करत म्हटले की, ही बाब विनाकारण मोठा मुद्दा बनवली जात आहे. त्यांनी असेही विचारले की, यामध्ये काय अडचण आहे? एक मूक प्राणी आत आला तर असं कोणतं मोठं संकट उद्भवलं? हा लहान आहे, चावणारा नाही. चावणारे तर संसदेच्या आतमध्ये अन्य लोक आहेत. त्यांच्या या विधानाने वादाला आणखी खतपाणी घातलं.
रेणुका चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधकांबद्दलच्या टीकेवरही प्रतिक्रिया दिली. त्यांनी विचारले की जर सरकारला अधिवेशनाची इतकी काळजी होती, तर नियोजित एक महिन्याचे अधिवेशन फक्त पंधरा दिवसांचे का करण्यात आले? त्यांनी विचारले, "सभेत आम्ही कोणते मुद्दे उपस्थित करणार आहोत याची तुम्हाला भीती का वाटते? पुरेसे मुद्दे नव्हते का? मग अधिवेशन का कमी करण्यात आले?"
तर भाजप खासदार जगदंबिका पाल यांनी रेणुका चौधरी यांच्यावर त्यांच्या विशेषाधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आणि म्हटले की संसद ही राष्ट्रीय धोरणांवर गंभीर चर्चेसाठी एक व्यासपीठ आहे आणि अशा कृती संसदेच्या प्रतिष्ठेच्या विरोधात आहे.
तसेच त्या म्हणाल्या, "आपल्या कुत्र्यासह संसदेत येणे आणि नंतर अशा टिप्पण्या करणे, हे देशाला लाजीरवाणं करणं आहे. त्यांच्याविरोधात कारवाई झाली पाहीजे." त्यांनी हा लोकशाहीचा अपमान असल्याचे म्हटले आणि कडक भूमिका घेण्याची मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.